उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्र
उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्र 
ॲग्रो गाईड

उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्र

डॉ. एस.पी. म्हेत्रे, डॉ. आर. एस. जाधव, व्ही. आर. घुगे

गत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने बियाणांची उगवणशक्ती कमी राहण्याची शक्यता आहे. अशा वेळी घरगुती पातळीवर बियाणाच्या उपलब्धतेसाठी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन केल्यास उपयुक्त ठरेल. उत्तरार्ध आंतरमशागत : पीक २० ते ३५ दिवसाचे असताना दोन कोळपण्या (१५ ते २० दिवस पहिली आणि ३० ते ३५ दिवसांनी दुसरी) व एक निंदणी करून शेत तणविरहित ठेवावे. एकदा सोयाबीनला फुले लागली की कोळपणी करू नये, अन्यथा सोयाबीनच्या मुळ्या तुटून नुकसान होते. सिंचन नियोजन : पेरणीच्या अगोदर तुषार सिंचनाने पाणी देवून पेरणी करावी. थंडीमुळे तापमान कमी असेल तर पूर्णत: उगवणीसाठी १० ते १२ दिवस लागू शकतात. चांगल्या उगवणीसाठी पेरणीनंतर ५ दिवसांनी पुन्हा तुषार सिंचनाने हलके पाणी द्यावे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात १० ते १२ दिवसांच्या अंतराने तसेच मार्च व एप्रिल महिन्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. सोयाबीनमध्ये रोप, फुलोऱ्याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याचा ताणास संवेदनशील असल्यामुळे या कालावधीत पाटाने पाणी द्यावे. ज्या शेतात बीजोत्पादन घ्यावयाचे आहे, त्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पीक पेरणी ते काढणी या कालावधीत साधारणत: जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० पाणी पाळ्याची आवश्यकता आहे. भेसळ काढणे : सोयाबीन पिकामध्ये झाडांची उंची, पानांचा आकार, झाडावरील लव, पान, खोड व फुलांचा रंग इत्यादी लक्षणांनुसार भेसळ ओळखून नष्ट करावी. पीक संरक्षण : किडी ः उन्हाळी सोयाबीन पिकावर तंबाखुवरील पाने खाणारी अळी, घाटेअळी, वाटाण्यावरील शेंगा पोखरणारी अळी तसेच पांढरी माशी व तुडतुडे इ. किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या किडींच्या नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करावी. फवारणी प्रति लिटर पाणी प्रोफेनोफॉस (५० ईसी) २ मि.लि. किंवा लँबडा सायहॅलोथ्रीन (४.९ सी.एस.) ०.६ मि.लि. किंवा थायामिथोक्झाम (१२.६०%) अधिक लँबडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेडसी) ०.२५ मि.लि. किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. रोग ः उन्हाळी सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. मात्र, ‘यलो व्हेन मोझॅक’ या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. अशी प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास ती उपटून नष्ट करावीत. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढल्यास या रोगाचा प्रसार वेगाने होतो. त्यामुळे पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकडे लक्ष ठेवावे. त्यासाठी फवारणी प्रति लिटर पाणी थायामिथोक्झाम (१२.६०%) अधिक लँबडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेडसी) ०.२५ मि.लि. काढणी व मळणी : शेंगा पिवळ्या पडून पक्व होताच पिकाची काढणी करावी. कापणीनंतर पिकाचे छोटे-छोटे ढीग करून २-३ दिवस उन्हात चांगले वाळवून घ्यावे. मळणी यंत्राची गती कमी करून मळणी करावी. बियाण्याच्या बाह्य आवरणाला इजा पोचणार नाही, याकडे लक्ष द्यावे. मळणी करताना बियाण्यातील आर्द्रता १४ टक्क्यापर्यंत असेल तर मळणी यंत्राच्या फेऱ्यांची गती ४०० ते ५०० फेरे प्रति मिनीट इतकी ठेवावी. बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्क्यापर्यंत असेल तर गती ३०० ते ४०० फेरे प्रति मिनीट इतकी ठेवावी. साधारणत: उन्हाळी हंगामामध्ये तयार झालेल्या बियाण्याचा रंग पिवळसर हिरवट असतो. साठवण : मळणीनंतर बियाणे ताडपत्री किंवा सिमेंटच्या खळ्यावर पातळ पसरून बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यापर्यंत आणावे. बियाणे स्वच्छ केल्यानंतर पोत्यात भरून साठवण करावी. साठवणीचे ठिकाण थंड, ओलावारहित व हवेशीर असले पाहिजे. साठवण करताना एकावर एक चार पेक्षा जास्त पोती ठेवू नयेत. उत्पादन : उन्हाळी सोयाबीनचे एकरी ३ ते ५ क्विंटलपर्यंत सरासरी उत्पादन येऊ शकते. महत्त्वाचे...

  • उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन खरीप हंगामासारखे होत नाही. दाण्याचा आकार लहान असतो. १०० दाण्याचे वजन ८ ते १० ग्रॅम असते.
  • उन्हाळी सोयाबीनचा हंगाम फक्त घरच्या घरी बीजोत्पादन करण्यासाठी चांगला आहे.
  • खरीप २०२० मध्ये सोयाबीन काढणीवेळी आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात भिजलेले असेल. अशा बियाण्याची उगवणक्षमता कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन घेण्यास हरकत नाही.
  • डॉ. एस.पी. म्हेत्रे, ७५८८१५६२१० व्ही. आर. घुगे, ७५८८१५६२१३ ( सोयाबीन संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

    Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

    Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

    Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

    Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

    SCROLL FOR NEXT