संतुलीत आहार स्रोत ः सीताफळ
संतुलीत आहार स्रोत ः सीताफळ 
ॲग्रो गाईड

संतुलीत आहार स्रोत ः सीताफळ

डॉ. हेमंत रोकडे, डॉ. अविनाश काकडे

सीताफळाची लोकप्रियता कोरडवाहू लागवडयोग्य, कीड रोगाच्या दृष्टीनेही काटक अशा गुणधर्मामुळे वाढत आहे. हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आहारामध्ये सीताफळांचा समावेश केल्यास त्याचे अनेक फायदे दिसून येतात. पोर्तुगीजांसोबत भारतात आलेले सीताफळ सुरवातीला दक्षिण किनारी रुजले. हळूहळू या फळाची लोकप्रियता वाढत गेली. संपूर्ण देशभरात त्याची लागवड आणि उपलब्धता होऊ लागली. पूर्वी राजे महाराजांचे आवडते असलेले हे फळ सर्वसामान्यांपर्यंत पोचले. हे फळ पोषकतेच्या दृष्टीने संतुलित मानले जाते. या फळात शर्करेप्रमाणे तंतूमय पदार्थ व अन्य पौष्टिक द्रव्ये आहेत. या फळातील शर्करा टिकाऊ ऊर्जा देतात. सीताफळात भरपूर जीवनसत्वे, क्षार, फायबर आणि प्रथिने असतात. मात्र, त्यात स्निग्ध पदार्थ जवळजवळ नसतात. त्यामुळे शरीरास ऊर्जा मिळत असली तरी फॅटचे प्रमाण कमी राहतो. या फळात जीवनसत्त्व क बरोबरच बी-६, बी-२, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम यांचेही प्रमाण संतुलित आढळते. क जीवनसत्त्व ः साधारण १०० ग्रॅम खाद्य गरामधून एका दिवसासाठी आवश्यक ‘क’ जीवनसत्त्वाचा ११० टक्के पुरवठा होतो. म्हणजेच पाव किलो सीताफळ घेतले तरी आपली क जीवनसत्त्वाची गरज पूर्ण होते. क जीवनसत्त्व हे ॲटिऑक्सिडंट असून, त्यांचा आहारात योग्य प्रमाणात वापर असल्यास कर्करोगाचा धोका टाळता येतो. विविध प्रकारच्या ताणतणावातून जाताना, संसर्गजन्य जिवाणूंशी लढताना, शस्त्राक्रियेनंतर जखमा भरण्यासाठी आपणांस क जीवनसत्त्वाची गरज भासते. मॅग्नेशिअम ः शरीरास आवश्यक असणारे मॅग्नेशिअम सीताफळातून उपलब्ध होऊ शकते. प्रमाणात असलेल्या मॅग्नेशिअममुळे स्नायूंना आराम मिळतो. ह्रदयविकार टाळण्यासाठीसुद्धा मॅग्नेशिअम शरीरास आवश्यक आहे. जर आपण खेळाडू असाल तर मज्जातंतूच्या आणि सांध्यासाठी पोटॅशिअम, जीवनसत्त्व आणि क्षारांची गरज भागविण्यासाठी सीताफळांचे सेवन अत्यंत फायद्याचे ठरते. ताज्या १०० ग्रॅम खाद्य गरातील प्रमाण ः पाणी - ७३.५ टक्के प्रथिने - १.६ टक्के स्निग्ध पदार्थ - ०.३ टक्के खनिज द्रव्ये - १.३ टक्के तंतुमय पदार्थ - २.१ टक्के पिष्टमय पदार्थ - ६९.३ टक्के कॅल्शिअम - ०.०२ टक्के स्फुरद - ०.०४ टक्के लोह - १.० टक्के उष्मांक - १०५ कॅलरी डॉ. हेमंत रोकडे, ९८८१७७५०९५ डॉ. अविनाश काकडे, ८०८७५२०७२० (वरिष्ठ संशोधक सहाय्यक, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, (नाहेप-कास्ट-डी.एफ.एस.आर.डी.ए.), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT