बरसीम पीक लागवड
बरसीम पीक लागवड 
ॲग्रो गाईड

बरसीम पीक लागवड

सुधीर सूर्यगंध

बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे. कमी खर्चात अधिक चारा उत्पादन देणारे हे पीक आहे. यामध्ये १६-१८ टक्के प्रथिने असतात. या पिकाच्या मुळाशी असलेल्या गाठीतून नैसर्गिकरीत्या २०० ते २५० किलो नत्र प्रतिहेक्‍टरी मिळते. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारून त्यानंतर घेतलेल्या पिकाला त्याचा फायदा होतो.

जमीन :  मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन असावी. काळी कसदार, गाळाची, उत्तम प्रतीची जमीन या पिकास आवश्‍यक असते.

पूर्वमशागत :  एकदा नांगरट करून २ ते ३ वेळा कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पेरणीसाठी सपाट वाफे तयार करून घ्यावेत.

पेरणी :  या पिकाची पेरणी ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात करावी. पेरणीसाठी प्रतिहेक्‍टरी ३० किलो बियाणे वापरावे. रायझोबियम जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे. पेरणीपूर्वी बरसीमचे बी १० लिटर पाण्यात १०० ग्रॅम मीठ टाकून केलेल्या द्रावणात टाकावे. हे द्रावण हलवावे. असे केल्याने पोचट, हलके बी वर तरंगतात. वर तरंगत असलेले बी व केरकचरा काढून टाकावा.

सुधारित जाती :  वरदान, मेस्कावी, जे.बी.-१, एच.बी.-१४६ इत्यादी जातींचा वापर लागवडीसाठी करावा.

खते : पेरणीपूर्वी प्रतिहेक्‍टरी १० ते १२ बैलगाड्या शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीवेळेस प्रतिहेक्‍टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.

आंतरमशागत :  एक खुरपणी व एक कोळपणी करून शेत तणविरहीत ठेवावे.

पाणी व्यवस्थापन :  या पिकास साधारणपणे १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. सुरवातीच्या दोन आठवड्यांमध्ये एक आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावे. उत्पादन : पहिली कापणी पेरणीनंतर ४५-५० दिवसांनी व त्यानंतरच्या कापण्या २५-३० दिवसांनी कराव्यात. या पिकाचे हिरव्या चाऱ्याचे उत्पादन ३ ते ४ कापण्यांमध्ये ६०० ते ८०० क्विंटल प्रतिहेक्‍टरी इतके आहे. 

संपर्क : सुधीर सूर्यगंध - ९८२२६११९३४ (लेखक डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, जि. कोल्हापूर येथे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन) आहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Water Dams : कोल्हापुरातील मोठ्या धरणांत गतवर्षीपेक्षा जास्त पाणीसाठी, वळीव पावसाने दिलासा

Lok Sabha Election : राज्यात ५ व्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kharif Season : खरीपपूर्व शेती कामांना सुरूवात

Sopankaka Palkhi : संत सोपानकाका महाराज पालखीचे ३ जुलैला प्रस्थान

Cotton Cultivation : खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवडीची तयारी वेगात

SCROLL FOR NEXT