planning of jasmine flowers cultivation 
ॲग्रो गाईड

नियोजन मोगरावर्गीय फुलशेतीचे

मोगरावर्गीय फुलझाडामध्ये मोगरा, जाई, जुई, चमेली, सायली, नेवाळी, कागडा इ. फुलांचा समावेश होतो. फुलांच्या कळ्यांना गजरा, हार, गुच्छ यासाठी भरपूर मागणी असते. या वर्गातील फुलझाडाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील कोणता ना कोणता फुलाचा प्रकार बाराही महिने फुलत असतो. पद्धतशीर नियोजन करून लागवड केल्यास वर्षभर नियमितपणे फुलांचे उत्पादन मिळविता येते.

प्रा. भुषण तायडे

मोगरावर्गीय फुलझाडामध्ये मोगरा, जाई, जुई, चमेली, सायली, नेवाळी, कागडा इ. फुलांचा समावेश होतो. फुलांच्या कळ्यांना गजरा, हार, गुच्छ यासाठी भरपूर मागणी असते. या वर्गातील फुलझाडाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील कोणता ना कोणता फुलाचा प्रकार बाराही महिने फुलत असतो. पद्धतशीर नियोजन करून लागवड केल्यास वर्षभर नियमितपणे फुलांचे उत्पादन मिळविता येते. मोगरा वर्गीय फुलांना परदेशात प्रामुख्याने आखाती देशात भरपूर मागणी आहे. फ्रान्समध्ये या फुलांपासून मोठ्या प्रमाणात सुगंधी द्रव्ये तयार करतात. या सुगंधी द्रव्यांचा उपयोग अत्तरे, सुवासिक तेले, सौंदर्य प्रसाधने, साबण, लिपस्टिक इ. बनवण्यासाठी होतो. काही मोगरा वर्गीय फुलांचा उपयोग कट फ्लॉवर म्हणून केला जातो. उन्हाळ्यात मोगरा, हिवाळ्यात कागडा, नेवाळी, सायली तर पावसाळ्यात जाई-जुईची फुले उपलब्ध होतात. हवामान व जमीन

  • मोगरा, जुई, कुंदा, चमेली इ. फुलांच्या लागवडीच्या पद्धतीत बरेच साम्य आहे. ज्या प्रदेशात उन्हाळा उबदार व हिवाळा सौम्य असतो अशा ठिकाणी मोगरा वर्गीय फुलझाडे चांगली बहरतात. सर्वसाधरणपणे मोगरा वर्गीय फुलझाडे हवामानाच्या दृष्टीने अत्यंत काटक असतात. उष्ण-कोरडे, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या पिकाला अतिशय अनुकूल आहे. अति थंडी, धुके आणि दव यामुळे पिकच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.
  • सुगंधी अर्कासाठी फुलझाडाची लागवड करताना फुलांचा बहर मध्यम हिवाळा आणि सौम्य उन्हाळा असताना म्हणजेच साधारणपणे फेब्रुवारी-मार्च महिन्यात येईल अशा प्रकारे करावे.
  • लागवडीसाठी हलकी व मध्यम काळी सामू ६.५ ते ७ असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी भारी जमीन योग्य आहे. दलदल किंवा पाणथळ, भरपूर खोलीची, चुनखडीयुक्त जमीन लागवडीसाठी निवडू नये.
  • अभिवृद्धी आणि लागवड

  • मोगरा वर्गीय फुलझाडांची अभिवृद्धी फाटे कलमाने करतात. फाटे कलमासाठी निवडलेली फांदी जोमदार वाढीची, पूर्ण पक्व आणि पेन्सिलच्या जाडीची असावी.फांदीवरील मध्यभागातील चार ते पाच डोळे असलेले १८ ते २० से.मी. लांबीचे तुकडे फाटे कलमासाठी वापरावेत. मोगरा वर्गीय फुलझाडे बहुवर्षायू असून एकदा लागवड केल्यानंतर त्याच जागी आठ ते दहा वर्षे राहतात. 
  • लागवड उन्हाळा व पावसाळा अशा दोन्ही हंगामात करता येते.
  • वळण आणि छाटणीच्या पद्धती

  • मोगरा वर्गीय फुलझाडांची व्यापारी लागवड जास्त फायदेशीर होण्यासाठी वेलींवर नवीन फुटीचे प्रमाण जास्त असणे आवश्यक आहे. त्यामुळे फुले जास्त मिळतात. यासाठी वेलींच्या झुडपांची हलकी ते मध्यम प्रमाणात छाटणी करावी.
  • छाटणीची वेळ प्रत्येक जातीत वेगवेगवेगळी असते. उदा. चमेली- डिसेंबर-जानेवारी, जाई-जुई, कुंदा- नोव्हेंबर.
  • खते

  • काही मोगरा वर्गीय फुले सदाहरित आहेत. काही जातींना एकवेळा किंवा दोनवेळा तर काही जातींना वर्षभर फुले येतात. तीन वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडाला दरवर्षी १० किलो शेणखत, १०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश तीन समान हप्त्यात विभागून जानेवारी, एप्रिल आणि ऑगस्ट महिन्यात द्यावे.
  • आंतर पिके

  • लागवड केल्यानंतर त्यामध्ये भुईमूग, श्रावण घेवडा, कोबी, फ्लॉवर यासारखी कमी कालावधीची भाजीपाला पिके घेता येतात.
  • फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री

  • लागवडीच्या पहिल्या वर्षीच काही प्रमाणात फुले येतात. त्यानंतर पुढील वर्षी फुलांचे उत्पादन वाढते. मार्च ते ऑक्टोबर या कालावधीत फुले येतात. वेणी, गजरा यासाठी फुले उमलण्यापूर्वी म्हणजे पूर्ण वाढ झालेल्या कळी अवस्थेत फुलांची तोडणी करावी.
  • पूजेसाठी, हारासाठी किंवा सुगंधी अर्क काढण्यासाठी पूर्ण उमललेली फुले काढावीत. मोगऱ्याचे झाड १० ते १२ वर्षे चांगली फुले देते. वर्षाला हेक्टरी ८ ते १० टन फुलांचे उत्पादन मिळते. जाई-जुई चे ३ ते ४ टन उत्पादन मिळते. एक टन फुलांपासून २.८ ते ३ किलो सुगंधी द्रव्यांचा उतारा मिळतो.
  • सुधारित जाती मोगरा

  • मोगऱ्याला उन्हाळी व पावसाळी हंगामात फुलांचा बहर येतो. उन्हाळ्यात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात फुलांचा हंगाम असतो. फुले पांढरीशुभ्र एकेरी किंवा दुहेरी पाकळीची असतात. यामध्ये सिंगल मोगरा, डबल मोगरा, मदनबाण, रामबाण, गुडूमल्ली इ. जाती उपलब्ध आहेत.
  • जाई-जुई

  • जाईच्या पाकळ्या इतर प्रकारातील फुलापेक्षा मोठ्या असतात. पाकळ्यांपासून सुगंधी द्रव्य मिळते. जुईंच्या फुलांचा उपयोग गजरे करण्यासाठी व सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी केला जातो. यामध्ये लॉंग पॉईंट, लॉंग पॉईंट राऊंड, शॉर्ट पॉईंट इ. जाती उपलब्ध आहेत.
  • पिवळी जाई

  • यास सुवर्ण चमेली असे म्हणतात. फुले लहान आकाराची, पाच पाकळ्यांची आणि सोनेरी पिवळ्या रंगाची असून त्यांना मंद वास असतो. वेलींना हिवाळी हंगामात फुले येतात.
  • कुंद

  • झाडाला वर्षभर फुले येतात. कळी अवस्थेत फुले लालसर, जांभळट रंगाची असतात.
  • कागडा

  • फुलांचा बहर हिवाळ्यात येतो. पांढऱ्या रंगाची फुले झुबक्यांनी येतात.
  • सायली

  • वेलींना हिवाळ्यात फुले येतात. फुले चांदणीच्या आकाराची आणि पांढरीशुभ्र असतात.
  • संपर्क - प्रा. भुषण तायडे, ९७६६८०८३२४ (के.के. वाघ उद्यान विद्या महाविद्यालय, नाशिक)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

    Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

    Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

    APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

    Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

    SCROLL FOR NEXT