Nutritious bio fortified varieties of different crops
Nutritious bio fortified varieties of different crops 
ॲग्रो गाईड

मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाण

दीप्ती पाटगांवकर

जैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व परिपूर्ण अन्नाची उपलब्धता सहज शक्य आहे. जैवसंपृक्त पिकांच्या वाणांमध्ये इतर वाणांच्या तुलनेत जास्त प्रमाणात जीवनसत्त्व, जस्त, लोह तसेच इतर सूक्ष्म पोषक घटक असतात.  जगभरामध्ये आरोग्याचा गंभीर प्रश्‍न म्हणून कुपोषणाकडे पाहिले जाते. आहारातील पौष्टिक घटकांचा असमतोल कुपोषणास कारणीभूत ठरतो. विकसनशील देशांमध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त आढळून येते. अमिनो आम्ल, जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे मानवी शरीर विविध रोगांसाठी संवेदनशील बनते. यासाठी आहारातील विविधता, अन्नाचे मूल्यवर्धन, औषधांच्या माध्यमातून पोषकद्रव्यांची उपलब्धता करणे असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, नैसर्गिकरीत्या पोषकद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी जैवसंपृक्त पिके हा उत्तम पर्याय आहे. पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असलेली जैवसंपृक्त पिके कुपोषण निर्मूलनात महत्त्वाची मानले जातात.  जैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व परिपूर्ण अन्नाची उपलब्धता सहज शक्य आहे. त्यासाठी जैवसंपृक्त पिकांच्या वाणांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. जैवसंपृक्त पिकांच्या वाणांमध्ये इतर वाणांच्या तुलनेत जास्त प्रमाणात जीवनसत्त्व, जस्त, लोह तसेच इतर सूक्ष्म पोषक घटक असतात.  पिकांचे विविध वाण रताळे 

  • रताळे बीटा कॅरोटीनचा उत्तम स्रोत असून त्याचे रूपांतर जीवनसत्त्व अ मध्ये होते. 
  • ५ वर्षांपेक्षा कमी वयोगटाच्या ४४ टक्के मुलांमध्ये जीवनसत्त्व अ ची कमतरता दिसून येते.
  • जीवनसत्त्व अ ची कमतरता दूर करण्यासाठी लहान मुलांच्या खाद्यामध्ये याचा वापर फायदेशीर ठरतो.
  • हे वाण राष्ट्रीय कंद पीक संशोधन केंद्र, तिरुवनंतपुरम (केरळ) येथे विकसित करण्यात आले.
  • गहू अ) एचपीबीडब्यू ०१

  • लोह ४० पीपीएम आणि जस्त ४०.६ पीपीएम प्रमाण असते.
  • धान्य उत्पादन;  हेक्टरी ५१.७ क्विंटल.
  • परिपक्वता कालावधी:  १४१ दिवस. 
  • अखिल भारतीय समन्वित गहू व बार्ली संशोधन प्रकल्पांतर्गत पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना यांनी विकसित केले.
  • प्रसारण वर्ष:  २०१७
  • ब) डब्ल्यूबी ०२ 

  • झिंक ४२.० पीपीएम आणि लोह ४०.० पीपीएम.
  • धान्य उत्पादन:  हेक्टरी ५१.६ क्विंटल.
  • परिपक्वता कालावधी:  १४२ दिवस. 
  • अखिल भारतीय समन्वित गहू आणि बार्ली संशोधन केंद्र, करनाल येथे विकसित करण्यात आले.
  • प्रसारण वर्ष : २०१६
  • भात  अ) सी.आर.३१०

  • यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १०.३ टक्के तर इतर वाणांमध्ये ७-८ टक्के असते.
  • धान्य उत्पादनः  हेक्टरी ४५ क्विंटल.
  • परिपक्वता कालावधी:  १२५ दिवस.
  • राष्ट्रीय भात संशोधन संस्था, कटक (ओडिशा) येथे विकसित करण्यात आले.
  • प्रसारण वर्ष:  २०१६ 
  • ब) रत्नागिरी- ७ (लाल भात)

  • लोह १५.४ पीपीएम आणि झिंक २३.८ पीपीएम.
  • धान्य उत्पादन  हेक्टरी ५१.६ क्विंटल.
  • परिपक्वता कालावधी:  १४२ दिवस.
  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी विकसित केले.
  • प्रसारण वर्ष:  २०१७
  • क) डी.आर.आर- ४५

  • झिंकचे प्रमाण २२.६ पीपीएम इतके असते.
  • पॉलिश केलेल्या धान्यांमध्ये झिंक प्रमाण २२.६ पीपीएम तर इतर लोकप्रिय वाणांमध्ये १२ ते १६ पीपीएम इतके असते.
  • धान्य उत्पादन:  हेक्टरी ५० क्विंटल.
  • परिपक्वता कालावधी:  १२५-१३० दिवस. 
  • भारतीय भात संशोधन संस्था, हैदराबाद येथे विकसित करण्यात आले. 
  • प्रसारण वर्ष : २०१७
  • काळा तांदूळ (Chak Hao) 

  • अँटीऑक्सिडेंट्स, तंतुमय पदार्थ, खनिजे आणि इतर दाहक विरोधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. 
  • १०० ग्रॅम काळ्या तांदळामध्ये ८.५ ग्रॅम प्रथिने असतात.
  • मका  अ) पुसा विवेक (क्युपीएम ९)

  • ही देशातील पहिली जीवनसत्त्व-अ समृद्ध मका आहे.
  • यामध्ये प्रो व्हिटॅमिन-ए ८.१५ पीपीएम, लाइसाइन २.६७ टक्के, ट्रिपटोफॅन ०.७४ टक्के प्रमाण असते. तर लोकप्रिय संकरित वाणांमध्ये प्रो व्हिटॅमिन-ए १ ते २ पीपीएम, लाइसाइन १.५-२ टक्के आणि ट्रिपटोफॅन ०.३ ते ०.४ टक्के असते.
  • धान्य उत्पादनः हेक्टरी ५५.९ क्विंटल.
  • परिपक्वता कालावधी:  ९३ दिवस.
  • भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांनी विकसित केले.
  • ब) पुसा.एच.एम-८

  • ट्रीप्टोफेन १.०६ टक्के आणि लिसिनचे प्रमाण ४.१८ टक्के इतके असते. 
  • धान्य उत्पादन:  हेक्टरी ६२.६ क्विंटल.
  • परिपक्वता कालावधी:  ९५ दिवस. 
  • प्रसारण वर्ष ः २०१७
  • बाजरी 

  • वाण:  ए.एच.बी.-१२०० 
  • यामध्ये लोहाचे प्रमाण ७३ पीपीएम तर लोकप्रिय वाणामध्ये ४५-५० पीपीएम असते.
  • धान्य उत्पादन:  हेक्टरी ३२ क्विंटल.
  • सुका चारा:  हेक्टरी ७० क्विंटल.
  • परिपक्वता कालावधी:  ७८ दिवस. 
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत बाजरी संशोधन केंद्र, एनएआरपी, औरंगाबाद येथून विकसित केले.
  • प्रसारण वर्ष:  २०१७.
  • ज्वारी 

  • वाण:  पी.व्ही.के. १००९ 
  • हा देशातील ज्वारीचा पहिला जैव समृद्ध वाण आहे.
  • यामध्ये लोह ४० ते ४२ मिलिग्रॅम आणि जस्त २३ ते २५ मिलिग्रॅम इतके असते. लोह आणि जस्ताचे प्रमाण जास्त असल्यामुळे महिला आणि लहान मुलांमधील कुपोषणमुक्तीसाठी उपयुक्त ठरते.
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विकसित करण्यात आले.
  • प्रसारण वर्ष:  २०१८.
  •   भेंडी 

  • वाण:  काशी ललिमा  
  • यामध्ये अँटी ऑक्सिडंट, लोह आणि कॅल्शिअम यांसह इतर पोषणद्रव्ये मुबलक प्रमाणात आहेत. 
  • चिकटपणा कमी असल्यामुळे सॅलड बनवण्यासाठी उपयुक्त आहे. 
  • भारतीय भाजीपाला संशोधन संस्था, वाराणसी यांनी  विकसित केले आहे. 
  • फुलकोबी 

  • वाण:  पुसा बीटा कॅरोटीन फुलकोबी
  • हे देशातील पहिले फुलकोबीचे जैवसंपृक्त वाण आहे.
  • यामध्ये कॅरोटीनचे प्रमाण ८-१० पीपीएम असून इतर लोकप्रिय वाणांमध्ये नगण्य प्रमाण असते.
  • उत्पादन:  हेक्टरी ४०-५० टन.
  • भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांनी विकसित केले. 
  • प्रसारण वर्ष :  २०१५.
  • ( संकलन संदर्भ :  Bio fortified Varieties: Sustainable Way to Alleviate Malnutrition, ICAR, New Delhi, प्रकाशन वर्ष-२०१७)  संपर्क- प्रा. दीप्ती पाटगांवकर, ९४०४९८८७७० (कृषी विज्ञान केंद्र. औरंगाबाद.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT