health benefits of pomegranate  
ॲग्रो गाईड

डाळिंबाचे औषधी गुणधर्म 

डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल रंग आणि त्याचे औषधी गुणधर्म यामुळे त्याला बाजारात खूप मागणी आहे. डाळिंबामध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम ही खनिजे मुबलक प्रमाणात असतात.

डॉ. मन्मथ सोनटक्के

डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल रंग आणि त्याचे औषधी गुणधर्म यामुळे त्याला बाजारात खूप मागणी आहे. डाळिंबामध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम ही खनिजे मुबलक प्रमाणात असतात. डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल रंग आणि त्याचे औषधी गुणधर्म यामुळे त्याला बाजारात खूप मागणी आहे. डाळिंबामध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम ही खनिजे मुबलक प्रमाणात असतात. डाळिंब दाणे,  साल, फुले आरोग्यासाठी लाभदायक आहेत. डाळिंबामध्ये जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व सी, फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते.  आरोग्यासाठी फायदे 

  • शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी गुणकारी.
  • यातील मुबलक लोहाचे प्रमाण हे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यास फायदेशीर ठरते. 
  • फळामध्ये फॉलिक अॅसिड असल्यामुळे गर्भवती स्त्रियांसाठी डाळिंबाचा रस गुणकारी आहे.
  • शरीरातील ताप व उष्णता कमी करण्यास लाभदायक.
  • डाळिंबाचे दाणे चावून खाल्याने तोंडातील दुर्गंधी नाहीशी होते. चांगली चव येते.
  • अपचन, आम्लपित्त, पोटात गॅस, शौचास साफ न होणे यावर डाळिंब  गुणकारी ठरते.
  • शरीरातील साखर संतुलित व नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी.
  • डाळिंब खाल्ल्याने भूक वाढते. वजन कमी करण्यास तसेच, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डाळिंब ज्यूस उपयुक्त.
  • सालीचा अर्क सूक्ष्मजंतूंची वाढ थांबवितो,त्वचा निरोगी राखण्यासाठी डाळिंब फायदेशीर.
  • डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते.
  • वेदना प्रतिबंधक, वृद्धत्व विरोधी, मधुमेह, हृदयविकार तसेच कर्करोग यावर गुणकारी.
  • अनारदाना

  • चांगले पिकलेले डाळिंबाचे फळ अनारदाना बनवण्यासाठी वापरले जातात. यामध्ये फळांमधील दाणे काढून उन्हात किंवा ड्रायर मध्ये वाळवले जातात. वाळलेल्या या दाण्यामध्ये ५ ते १५ टक्के आम्ल, ९ ते १७ टक्के साखर आणि तंतुमय पदार्थ असतात.
  • पदार्थ शिजवताना आंबवण्यासाठी चिंच किंवा आमसुलाच्या ऐवजी याचा वापर केला जातो. 
  • डाळिंबाचा रस 

  • डाळिंब फळे स्वच्छ धुऊन त्याची साल काढून त्यातील लाल बिया वेगळ्या कराव्यात. नंतर बियांना मिक्सर किंवा फ्रुट ज्यूसर मधून काढून घ्यावा. हा रस  ८० ते ८२ अंश सेल्सिअस तापमानाला गरम करून घ्यावा. त्यानंतर थंड करून २४ तासासाठी तसाच राहू द्यावा, जेणेकरून त्यामधील बारीक कण तळाला जातील व पारदर्शक रस मिळेल.
  •  रस गाळून घेऊन तो  जास्त काळ टिकून राहण्यासाठी त्यामध्ये ६०० पीपीएम सोडिअम बेन्झोएट मिसळावे. त्यानंतर स्वच्छ, निर्जंतुकीकरण केलेल्या बाटली मध्ये रस भरावा. रसामध्ये सर्वसाधारणतः: १६ टक्के एकूण विद्राव्य घन पदार्थ, ०.३५ टक्के आंबटपणा नियंत्रित ठेवावा. 
  • डाळिंबामध्ये आकर्षक रंग व गोडी असल्यामुळे रसाला चांगली मागणी आहे. डाळिंबाच्या रसात इतर फळांचा रस मिसळून स्वादिष्ट पेय तयार करता येते.
  • प्रक्रियायुक्त पदार्थ

  • डाळिंबाच्या दाण्यापासून ७० ते ८० टक्‍के रस निघतो. डाळिंबापासून अनेक उत्तम,चवदार पौष्टिक पदार्थ तयार करता येतात. 
  • फळापासून जॅम,सरबत आणि अनारदाना यासारखे अनेक पदार्थ तयार करता येतात. फळे व प्रक्रियायुक्त पदार्थांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 
  • डाळिंबापासून रस, कार्बोनेटेड शीतपेये, अनारदाणा, जेली, सीरप, दंतमंजन, अनारगोळी असे अनेक पदार्थ तयार करता येतात. या प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. 
  • संपर्क- डॉ. मन्मथ सोनटक्के,९५११२९४०७४ (साहाय्यक प्राध्यापक, एम. जी. एम. अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

    RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

    Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

    eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

    Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

    SCROLL FOR NEXT