Banana orchards management which suffers from hailstorm
Banana orchards management which suffers from hailstorm 
ॲग्रो गाईड

..असे करा गारपीटग्रस्त केळीबागेचे व्यवस्थापन

प्रा.एन. बी. शेख, राहुल जाधव, सतीश माने

मागील आठवड्यात विदर्भ आणि खानदेशातील अनेक भागांत वादळी वारा व अवकाळी पावसासोबत गारपीट झाली. या तिन्हीचा एकत्रित परिणाम होऊन इतर रब्बी पिकांसोबत केळी पिकाचे ही मोठे नुकसान झाले. केळी झाडांची पाने फाटणे, नवीन येणाऱ्या पानांस इजा होणे, वाढीच्या अवस्थेतील घडांवर गारपिटीच्या माऱ्यामुळे खोलवर खड्डे व डाग पडणे, खोडावर इजा होणे, झाडे पूर्णपणे उन्मळून पडणे अशी स्थिती निर्माण झाली आहे. गारपिटीमुळे झालेल्या जखमांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. गारपीटग्रस्त केळी बागेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. उपाययोजना

  • पूर्णपणे उन्मळून पडलेली झाडे बागेबाहेर काढावीत. वाकलेल्या झाडांना आधार द्यावा.
  • विक्रीयोग्य घडांची त्वरित कापणी करून विक्री करावी.
  • घडांतील इजा झालेल्या केळी काढून त्यांची विल्हेवाट लावावी.
  • नवीन बागेतील जास्त नुकसान झालेल्या झाडांची १ ते २ नुकसानग्रस्त पाने कापून घ्यावीत.
  • सहा महिन्यांच्या झाडांची पाने पूर्णपणे फाटली असल्यास, अशी झाडे कापून बागेबाहेर काढून टाकावीत.
  • घड निसवण होऊन दोन महिने झालेल्या झाडांची पाने पूर्णपणे फाटली असली तरी, अशा घडांना पक्वतेसाठी फक्त पाण्याची गरज असते. म्हणून अशा झाडांचे योग्य पाणी व्यवस्थापन करावे.
  • ज्या झाडांची निसवण झालेली नाही, मात्र त्यांची पाने पूर्ण फाटून गेली आहेत. अशा झाडांना चार किंवा त्यापेक्षा जास्त पाने फुटण्याची वाट पाहावी. त्यासाठी झाडांचे योग्य व्यवस्थापन करावे. हे करूनही पाने न फुटल्यास अशी झाडे काढून टाकावीत.
  • संपूर्ण बागेतील झाडांची पाने फाटून गेली असल्यास, अशा झाडांचे योग्य पोषण करून नवीन जोमदार फुटव्यांना वाढवून पहिले खोडवा पीक घेता येऊ शकते.
  • कोवळ्या नुकसान ग्रस्त घडांचा वापर पशुखाद्य म्हणून करता येईल.
  • गारपिटीमुळे झाडांची पाने, खोड व घडांवर जखमा होऊन बुरशीजन्य किंवा जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. झाडांवर कार्बेन्डाझीम (आंतरप्रवाही बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • रोग नियंत्रण सिगाटोका लीफ स्पॉट - (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • मॅन्कोझेब २.५ ग्रॅम (स्पर्शजन्य बुरशीनाशक) किंवा
  • प्रोपीकोनॅझोल १ मिलि (आंतरप्रवाही बुरशीनाशक)
  • संपर्क - प्रा. एन. बी. शेख, ०२५७-२२५०९८६ केळी संशोधन केंद्र, जळगाव.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’

    Condensing Economizer : बायोगॅस ज्वलनातून मिळेल शुद्ध पाणी

    Sugarcane Bills : शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही, पांटबंधारे विभागाची वसुलीसाठी कसरत

    Onion Export Ban : संवेदनशील कांदा, असंवेदनशील राज्यकर्ते

    Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूर ७१ तर हातकणंगलेमध्ये ६८ टक्के चुरशीने मतदान

    SCROLL FOR NEXT