Corynespora fungal spots diseased cotton plant
Corynespora fungal spots diseased cotton plant 
ॲग्रो गाईड

कोरायनेस्पोरा बुरशीजन्य पानांवरील ठिपके रोगाचा प्रादुर्भाव

डॉ. शैलेश गावंडे, डॉ. दीपक नगराळे, डॉ. निळकंठ हिरेमनी

कपाशीचे पीक हे सध्या ६० ते ७५ दिवसांचे आहे. मागील काही दिवसांपासून सतत पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. पिकामध्ये बुरशीजन्य रोगांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. कपाशीचे पीक हे सध्या ६० ते ७५ दिवसांचे आहे. मागील काही दिवसांपासून सतत पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. पिकामध्ये बुरशीजन्य रोगांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. या सर्व पोषक घटकांमुळे या हंगामात कपाशीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. बदलते हवामान, कपाशीचे नवनवीन रोगास संवेदनशील संकरित वाणांची मोठ्या प्रमाणावर लागवड आणि बदललेली पीक पद्धती या सर्व बाबींमुळे नवीन रोगांचा प्रादुर्भाव कपाशीमध्ये आढळून येत आहे. रोगांच्या वाढत्या प्रसारामुळे उत्पादनात घट होते. मागील ३ वर्षांपासून कोरायनेस्पोरा पानावरील ठिपके या नवीन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पिकाच्या पाते तसेच बोंडे धरण्याच्या अवस्थेत आढळून येत आहे. त्याला इंग्रजीमध्ये टार्गेट लिफ स्पॉट (Target leaf spot) असे म्हणतात.  कारणे व लक्षणे

  • कोरायनेस्पोरा बुरशीजन्य पानांवरील ठिपके हा रोग कोरायनेस्पोरा कॅसिकोला या बुरशीमुळे होतो. 
  • या रोगाची तीव्रता प्रामुख्याने बागायती शेतात अधिक आढळते. 
  • उबदार, ओले व दमट हवामान दाट लागवड, नत्राचा जास्त वापर व दोन ओळींमधील कमी अंतर हे प्रमुख घटक रोगाच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतात. 
  • कपाशीवर या रोगाचा प्रादुर्भाव साधारणतः ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात आढळतो. 
  • सुरवातीच्या अवस्थेत जमिनीलगतच्या पानांवर रोगाचा प्रादुर्भाव होतो. नंतर टोकाकडच्या पानांकडे याचा प्रसार होतो. 
  • लक्षणे  रोगग्रस्त पानांवर गोलाकार किंवा अनियमित आकाराचे, गडद लाल रंगाचे, लहान-लहान ठिपके पडतात. त्यांचा आकार हळूहळू वाढून पानांवर गडद कडा असलेले तपकिरी रंगाचे डाग दिसू लागतात. रोगाची तीव्रता अधिक असेल तर पानगळ आणि फूलगळ झाल्याचे आढळते. परिणामतः झाडांची वाढ थांबून कापसाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.  एकात्मिक व्यवस्थापन

  • जमिनीची खोल नांगरणी करून जमीन कडक उन्हात तापू द्यावी.
  • रोगग्रस्त आणि संसर्गग्रस्त पिकांचा काडीकचरा काढून तो नष्ट करावा. 
  • पिकांची फेरपालट लागवड पद्धती अंमलात आणावी.
  • पिकांना चांगले कुजलेले सेंद्रिय खत द्यावे.
  • जास्त वाढ होणाऱ्या वाणांची /संकरांची लागवड शिफारसीत अंतराने करावी. नत्रयुक्त खतांचा शिफारशीपेक्षा अधिक वापर करू नये. 
  • रासायनिक नियंत्रण  (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • पायराक्लोस्ट्रॉबीन (२० टक्के डब्लू.जी.) १ ग्रॅम किंवा 
  • कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्लू.पी.) २ ग्रॅम किंवा 
  • मेटीराम (५५ टक्के) अधिक पायराक्लोस्ट्रॉबीन (५ टक्के डब्लू.जी.) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम किंवा 
  • प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के ई. सी.) १ मिली किंवा 
  • ॲझोक्सिस्ट्रॉबीन (१८.२ टक्के डब्लू/डब्लू) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ टक्के डब्लू/डब्लू ) (संयुक्त बुरशीनाशक) १ मिली किंवा 
  • क्रेसॉक्सिम मिथाईल (४४.३ टक्के एस. सी.) १ मिली किंवा 
  • फ्लूक्झापायरोक्झाड (१६७ डब्ल्यू/डब्ल्यू) अधिक पायरॉक्लोस्ट्रोबीन (३३३ डब्लू /डब्ल्यू) ०.६ ग्रॅम. आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
  • संपर्क- डॉ. शैलेश गावंडे, ७९७२४९११८१ (केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

    Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

    Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

    Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

    Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

    SCROLL FOR NEXT