Inter cropping system
Inter cropping system 
ॲग्रो गाईड

मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता

डॉ. रामचंद्र साबळे

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम विज्ञान प्रभाग, मुंबई आणि नागपूर विभागाकडून या आठवड्याच्या जिल्हावार हवामान अंदाजाच्या प्राप्त झालेल्या आकडेवारीच्या विश्‍लेषणानुसार कोकणात प्रतिदिनी ७ ते ४० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. कोकणात पावसास या आठवड्यात फारसा जोर राहणार नाही. उत्तर महाराष्ट्रात ३ ते २० मि.मी. म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातही अल्प ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना व परभणी जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्‍यता, तर उर्वरित जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज, तसेच मध्य विदर्भातही चांगल्या पावसाची शक्‍यता आहे. पूर्व विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत चांगल्या पावसाची शक्‍यता असून, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्‍यता आहे.  कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत चांगल्या पावसाची शक्‍यता आहे.    १ जून रोजी लांब पल्ल्याच्या दिलेल्या अंदाजामध्ये हे स्पष्ट केले होते, की या वर्षी मार्च, एप्रिल व मे महिन्यात राज्यांतील १५ ठिकाणी तापमान, वाऱ्याचा ताशी वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी याची आकडेवारी सर्वसाधारण आकडेवारीपेक्षा कमी नोंदली गेल्याचे आढळल्याने जून व जुलै महिन्यांत पावसाचा खंड पडेल व खंडित वृष्टी राहील. काही भागांत कमी कालावधीत अधिक पाऊस, तर काही भागात उघडीप राहील.  कोकण   सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारीख २८ व २९ जून रोजी ११ व १८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यात ४० व १३ मि.मी. पावसाची शक्‍यता असून, रायगड जिल्ह्यात ७ व १२ मि.मी. आणि ठाणे जिल्ह्यात ७ व ८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ८९ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १२ किलोमीटर राहील. उत्तर महाराष्ट्र  नाशिक जिल्ह्यात तारीख २८ व २९ जून रोजी ४ ते १७ मि.मी., धुळे व नंदूरबार जिल्ह्यात ३ मि.मी., तर जळगाव जिल्ह्यात १४ ते २० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. या आठवड्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ ते २१ कि.मी. राहील. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ते ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८० टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ४८ टक्के राहील. मराठवाडा  तारीख २८ व २९ जून रोजी १५ व २० मि.मी. पावसाची शक्‍यता असून, लातूर जिल्ह्यात १६ व १४ मि.मी., नांदेड जिल्ह्यात १६ व २५ मि.मी., बीड जिल्ह्यात १९ व ९ मि.मी., परभणी जिल्ह्यात ३२ व १४ मि.मी., हिंगोली जिल्ह्यात १६ व २१ मि.मी., जालना जिल्ह्यात ७७ व ९ मि.मी., तर औरंगाबाद जिल्ह्यात ८४ व ६३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे.  याकाळात बाष्पीभवनाचा वेग वाढेल. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, उस्मानाबाद, लातूर, बीड या जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. परभणी व जालना जिल्ह्यांत ते ३७ अंश सेल्सिअस राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ते ३८ अंश सेल्सिअस राहील. परभणी, लातूर व बीड जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस, उस्मानाबाद, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ते २६ अंश सेल्सिअस, तसेच नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८३ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३९ ते ४७ टक्के राहील. पावसाचे प्रमाण मध्यम राहील.  पश्‍चिम विदर्भ या भागात २ ते ४ दिवस पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील, तर अमरावती जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस राहील. मात्र बुलडाणा जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस, तसेच अकोला, अमरावती व वाशीम जिल्ह्यांत ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ७० टक्के, तर दुपारची ३८ ते ४० टक्के राहील.  मध्य विदर्भ या विभागात हलक्या पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील, तर नागपूर जिल्ह्यात ते ३७ अंश सेल्सिअस व यवतमाळ जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान २८ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ८० टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४२ टक्के राहील.  पूर्व विदर्भ या विभागात हलक्या पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील, तर उर्वरित जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील, तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ते ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ७९ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३६ ते ४२ टक्के राहील.  दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र या विभागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.  कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, पुणे व नगर जिल्ह्यांत २५ अंश व सोलापूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८५ टक्के, तर दुपारची ३९ ते ५८ टक्के राहील. 

कृषी सल्ला 

  • पावसात जेथे ८ ते १० दिवस उघडीप आहे आणि पावसाची शक्‍यता कमी आहे, तेथे ठिबक सिंचन, तुषार सिंचन पद्धतीने किंवा पाटाने संरक्षित पाणी द्यावे. 
  • जेथे सोयाबीनचे बियाणे उगवले नसेल तेथे दुबार पेरणी करताना बियांची उगवण शक्ती तपासून चांगला पाऊस होऊन ६५ मि.मी. ओलावा झाल्यानंतरच पेरणी करावी. 
  • आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
  • फळबागांना बहार धरलेला असल्यास आणि गेले ८ ते १० दिवस पाऊस झाला नसल्यास ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. 
  • पिकांमध्ये वेळीच तण नियंत्रण  करावे. 
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

    Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

    Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

    Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

    Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

    SCROLL FOR NEXT