सध्याच्या काळात पावसाने उघडीप दिल्यावर हळद पिकाची भरणी करावी. शिफारशीत मात्रेमध्ये खते द्यावीत. तण नियंत्रण करावे. माती लावताना संपूर्ण कंद झाकावा.भरणी केल्यामुळे नवीन येणारी हळकुंडे झाकली जातात, त्यांची चांगली वाढ होते.     
सध्या हळद लागवड होऊन दोन ते  अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पिकाची शाकीय वाढ होण्याचा (४६ ते १५० दिवस) हा कालावधी असतो.  या वेळी वातावरणात २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान असते. या अवस्थेमध्ये फुटवे येतात. हळदीच्या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची या अवस्थेमध्ये निश्चित होत असते. पावसाळी हंगामात खोड तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते. पावसाने उघडीप दिलेल्या काळात भरणी करावी. खते द्यावीत. तण नियंत्रण करावे.          भरणी करणे  
     - डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४    (हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज,जि. सांगली)