सद्यःस्थितीमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये हवामान ढगाळ आहे. काही भागात पाऊस होत आहे. अशा वातावरणात विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
यावर्षी सुरुवातीच्या काळात थंडी उशिरा सुरु झाली, मध्येच तापमान एकदम वाढून पुन्हा थंडी पडली. या वातावरणामुळे आंबा कलमांना पुन्हा मोहर आला. सद्यःस्थितीमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये हवामान ढगाळ आहे. काही भागात पाऊस होत आहे. अशा वातावरणात विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पुर्नमोहर आणि कीड,रोगांमुळे आंबा फळांची गळ वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये फळगळीच्या विविध कारणांचा अभ्यास करून उपाययोजना करावी.
पाणी व्यवस्थापन
भुरी, करपा रोग नियंत्रण मागील आठवड्यात राज्यातील काही भागात रिमझिम पाऊस झालेला आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात भुरी,करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देखील फळगळ होऊ शकते. सध्या गळून पडलेली फळे वेचून बागेबाहेर नेऊन त्यांची विल्हेवाट लावावी.जेणेकरून कीड-रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात येईल.
नियंत्रणाचे उपाय फवारणी ः (प्रतिलिटर पाणी ) करपा कॉपरऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम किंवा थायोफिनेट मिथाईल १ ग्रॅम. भुरी विद्राव्य गंधक २ ग्रॅम किंवा डिनोकॅप १ ग्रॅम
- बालाजी थोरात, ९१४५७७२२९३ (डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली,जि.रत्नागिरी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.