Chrysanthemum intercrop in sapota
Chrysanthemum intercrop in sapota 
ॲग्रो गाईड

झेंडू, शेवंती, फिलर्सचे आंतरपीक फायदेशीर

डॉ गणेश कदम, डॉ राजू, डॉ नवीन कुमार

झेंडू हे एक उत्तम सापळा पीक आहे. तसेच आंतरपीक म्हणून घेण्यासाठी हे उत्तम पीक आहे. शेवंतीचे आंतरपीक घेताना योग्य जातीची निवड तसेच मुख्य पिकाच्या फळधारणेचा विचार करावा. शेवंतीची वर्षभर फुले देणारी जात विकसित झाली आहे. ॲस्परॅगस, अॅकॅलिफा, क्रोटॉन, कुंती, वेगवेगळे पाम्स यासारख्या फिलर्स  पिकांचे विविध फळबागांमध्ये आंतरपीक घेता येते. 

झेंडू

  • आंतरपीक म्हणून घेण्यासाठी हे उत्तम पीक आहे. साधारणपणे  ३०x३० सें.मी. किंवा ४०x४०  सें.मी. अंतरावर लागवड केली जाते. अतिशय कमी कालावधीत फुल धारणा चालू होते. 
  • साधारणपणे नवीन संकरित जातींना ५० ते ५५ दिवसात फुले येण्यास सुरवात होते.  
  • झेंडू हे एक उत्तम सापळा पीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कीटक झेंडूच्या फुलांच्या पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात आणि फुलांवर अंडी देतात. अशा प्रकारे मुख्य पिकाचा किडींपासून काही प्रमाणात संरक्षण होते.  सूत्र कृमींचे नियंत्रण करण्यासाठी झेंडूची लागवड फायदेशीर ठरते. 
  • मोगरा

  • मोगऱ्याची लागवड १.२ x १.२ मीटर अंतरावर केली जाते. ज्या फळांची  लागवड जास्त अंतरावर केली जाते,त्यामध्ये मोगरा लागवड फायदेशीर ठरते.
  • नारळ, आंबा,  इत्यादी बागांमध्ये मोगऱ्याची लागवड करणे शक्य असते. 
  • मोगऱ्यामध्ये काही फुलपिके (झेंडू, गॅलार्डिया, ॲस्टर) आणि भाजीपाला पिकांची लागवड करता येते. 
  •  मोगरा हे बहुवार्षिक पीक आहे. साधारणपणे लागवडीपासून १२ ते १५ वर्षे फुले देते.
  • फिलर्स 

  •  फिलर्स म्हणजे विविध शोभिवंत झाडांची पाने आणि फांद्या यांचा वापर.गुच्छाचा आकार व शोभा वाढवण्यासाठी फुलांसोबत पानांचा वापर करतात. विविध प्रकारच्या फिलर्सला बाजारामध्ये चांगली मागणी असते.
  • सध्या ॲस्परॅगस (शोभिवंत शतावरी), अॅकॅलिफा, क्रोटॉन, कुंती/कामिनी, वेगवेगळे पाम्स, इत्यादींना चांगली मागणी आहे. यासारखे फिलर्सचे  पिकांचे विविध फळबागांमध्ये आंतरपीक घेता येते. 
  • बहुतांशी फिलर्स या बहुवार्षिक प्रकारच्या वनस्पती आहेत. कमीत कमी व्यवस्थापन आणि दीर्घकाळ टिकणारे फिलर्स सध्या असलेल्या परिस्थितीत आंतरपीक म्हणून एक चांगला पर्याय ठरू शकतो.
  • स्पेशॅलिटी फ्लॉवर्स  स्पेशॅलिटी फ्लॉवर्स म्हणजे विविध शोभिवंत फुलांचे प्रकार. 

  • हेलिकोनिया, बर्ड ऑफ पॅराडाईस, टॉर्च लिली, जिंजर लिली, कॉस्टस यांच्यामधील विविध आकार आणि रंग असलेली फुले या प्रकारात मोडतात.
  • प्रामुख्याने उष्ण आणि दमट वातावरणात यांची वाढ चांगली होते. प्रामुख्याने बहुवार्षिक असलेल्या वनस्पतींची नारळ, सुपारी यासारख्या बागांमध्ये  यशस्वीपणे लागवड करता येते. 
  • शेवंती

  • बाजारामध्ये या फुलाला चांगली मागणी आणि दर असतो. शेवंती फुलांच्या वाढीसाठी मोठी रात्र (११ ते १२ तास काळोख किंवा त्यापेक्षा जास्त काळ) आवश्यक आहे.
  • सध्या शेवंतीमध्ये दोन प्रकारच्या जाती आढळतात. प्रामुख्याने शेवंतीच्या जातीस रब्बी हंगामात म्हणजेच ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यात फुले येतात. सध्या एक नवीन जात उपलब्ध आहेत, जी वर्षभर फुले देते. म्हणून शेवंतीचे आंतरपीक घेताना योग्य जातीची निवड तसेच मुख्य पिकाच्या फळधारणेचा विचार करावा. 
  • साधारणपणे ३०x ३० सें.मी. किंवा ४०x४० सें. मी अंतरावर शेवंतीची लागवड करावी. 
  •  आंबा, नारळ, सीताफळ, चिकू, डाळिंब, पपई सारख्या फळपिकांमध्ये शेवंतीची लागवड फायदेशीर ठरते.
  •   - ०२०-२५५३७०२४  -  डॉ गणेश कदम, ८७९३११५२७७  ( पुष्प विज्ञान संशोधन निदेशनालय, शिवाजीनगर, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT