Banana bunch covering
Banana bunch covering 
ॲग्रो गाईड

व्यवस्थापन फळे,भाजीपाला पिकांचे

डॉ. प्रल्हाद जायभाये

काही भागांमध्ये गारपीट किंवा जोराचा पाऊस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गारपीट आपत्तीचे व्यवस्थापन तीन टप्प्यामध्ये करता येईल.

राज्याच्या अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. अशा स्थितीमध्ये पिकांना कमी अधिक प्रमाणात मार बसल्याची परिस्थिती आहे.  खानदेश पट्ट्यामध्ये काही भागामध्ये विशेषतः जळगाव जिल्ह्यामध्ये सोमवार रात्री उशिरापर्यंत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.  या पूर्वी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विदर्भ - मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट झाली. यात काढणीला आलेल्या व शेतात उभ्या असणाऱ्या गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी, करडई इ. पिकांना मोठा फटका बसला. सोबतच संत्रा वर्गीय फळबागा, द्राक्ष आणि डाळिंब बागासोबतच टोमॅटो, मिरची, पालक, कोबी अशा भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला होता. यापुढेही काही भागांमध्ये गारपीट किंवा जोराचा पाऊस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गारपीट आपत्तीचे व्यवस्थापन तीन टप्प्यामध्ये करता येईल. पूर्वतयारी   भारतीय हवामान विभागाकडून मिळणारे हवामानाचे अंदाज पाहणे, मिळवणे आवश्यक आहे. त्यामध्ये गारपीट किंवा तीव्र वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्यास त्या दृष्टीने पिकांच्या बचावाच्या शक्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.  गारपीट असताना घ्यावयाची काळजी  लोकांसाठी ः  गारपिटीदरम्यान लोकांनी घराबाहेर पडू नये. शक्यतो पक्क्या निवाऱ्यामध्ये थांबावे.  जनावरे ः  आपले पशू, पक्षी निवाऱ्याच्या ठिकाणी ठेवावेत. कुक्कुटपालन किंवा शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पत्र्याचे शेड असल्यास त्यावर पाचट, कडबा, वैरण, गवत, तुराट्या किंवा पऱ्हाट्या टाकून घ्याव्यात. गारपिटीच्या अचानक होणाऱ्या आवाजामुळे हे प्राणी किंवा पक्षी घाबरणार नाहीत. अनेक वेळा केवळ घाबरल्यामुळेही प्राणी, पक्ष्यांचा मृत्यू संभवतो.  गारपिटीनंतरचे व्यवस्थापन   गारपिटीमुळे मोडलेल्या , वाकलेल्या फांद्या कापून काढणे. त्यावर बोर्डो पेस्ट लावावी. गळून पडलेल्या फांद्या, फळे, फुले गोळा करून नष्ट करावेत. नवीन पालवी फुटून जोमाने वाढ होण्यासाठी आवश्यक ती खतमात्रा द्यावी. जनावरांना इजा झाली असल्यास पशूतज्ज्ञांकडून उपचार करावेत.  कोंबड्या, शेळीची पिल्ले यांचे लसीकरण करून घ्यावे.  मृत पशुपक्ष्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.  महत्त्वाच्या उपाययोजना  

  • अद्याप अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस किंवा गारपिटीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा वेळी पिकांच्या बचावासाठी काही शेतकरी व संशोधकांनी सुचवलेल्या उपाययोजना उपयुक्त ठरू शकतील. 
  • आपल्याकडे नाशिक पट्ट्यामध्ये द्राक्ष पिकांसाठी आणि हिमाचल प्रदेशांमध्ये सफरचंद बागेच्या गारपिटीपासून बचावासाठी गारपीटरोधक नायलॉन नेट (अॅण्टी हेल नेट) वापरले जाते. त्याचा वापर आर्थिकदृष्ट्या शक्य असल्यास नक्की करावा. 
  • गारपिटीचा फटका शेडनेटमध्ये घेतलेल्या पिकांना तुलनेने कमी बसतो. शक्य असल्यास महत्त्वाच्या पिकांची लागवड उदा. टोमॅटो शेडनेटमध्ये करण्याचे नियोजन करावे. 
  • केळीमध्ये घड निसवण्याच्या अवस्थेत घडास पॉलिथिन पिशवीने झाकून घ्यावे.
  • एका शेतकऱ्याने द्राक्ष घडांचा गारपिटीपासून बचावासाठी चंदेरी रंगाच्या द्रोण किंवा पेपरच्या साह्याने वरून खाली शंकूकृती आवरण देऊन बाग वाचवली होती. दोन वर्षापूर्वी अॅग्रोवनमध्ये याविषयी माहिती आली होती. गारपीट किंवा वादळी पावसाचा अंदाज असल्यास या तंत्राचा वापर करणे शक्य आहे. 
  • नवीन फळ बाग लागवडीमध्ये रोपे कडबा, पाचट, तुराट्या किंवा तागाच्या गोणी या पैकी उपलब्ध साहित्याने झाकून घ्यावीत. 
  • पीकनिहाय व्यवस्थापन गारपीटग्रस्त पिकांसाठी बारामती येथील अजैविक ताण संशोधन केंद्राने केलेल्या शिफारशी ः  मका 

  • गारपिटीमुळे २० टक्क्यापेक्षा कमी नुकसान झालेल्या पिकामध्ये युरियाची आळवणी केल्यास ५० ते ६० टक्क्यांपर्यंत उत्पादन मिळते.
  •  नुकसान २० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास आळवणीमुळे ३५ ते ४० टक्के उत्पादन मिळू शकते. 
  • वांगी 

  • मोडलेल्या किंवा दुखापत झालेल्या फांद्या व्यवस्थित कापून घ्याव्यात. त्याच प्रमाणे २० ते ३० सेंमी अंतरावर छाटणी करावी. 
  • यामुळे पुढे झाडाची वाढ चांगली होऊन किमान ७० ते ८० टक्के उत्पादन मिळू शकेल.
  • सीताफळ आणि डाळिंब  

  • गारपीट स्थितीमध्ये या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ते किमान पातळीवर ठेवण्यासाठी मोडलेल्या किंवा तुटलेल्या फांद्यांची कापणी करावी. सोबत आवश्यक त्या उर्वरित फांद्याची छाटणी करावी. 
  • त्यानंतर पोटॅशिअम नायट्रेट आणि युरिया खतांची मात्रा झाडाच्या अवस्थेनुसार योग्य प्रमाणात द्यावी. यामुळे बाग पुनरुज्जीवित होते. 
  • - डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९ (कृषी हवामानशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT