योग्य ओलाव्यावर करा पेरणी
योग्य ओलाव्यावर करा पेरणी  
ॲग्रो गाईड

योग्य ओलाव्यावर करा पेरणी

डॉ. आदिनाथ ताकटे

बाजरी

  • बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यावयाचे असल्यास सरी-वरंबा पद्धत फायदेशीर ठरते.
  • पेरणी १५ जून ते १५ जुलैदरम्यान करावी. पेरणीकरिता फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती या संकरित जाती आणि धनशक्ती ही सुधारित जात निवडावी. हेक्टरी ३ ते ४ किलो या प्रमाणात बियाणे वापरावे. प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम पीएसबी जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
  • पेरणी २ ते ३ से.मी.पेक्षा जास्त खोलीवर करू नये. कोरडवाहू क्षेत्रात ४५ x १५ सें.मी व नियमित पावसाच्या ठिकाणी अथवा पाण्याची सोय असल्यास ३० x १५ से.मी अंतरावर पेरणी करावी.
  • पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास प्रत्येकी २५ ग्रॅम अझोस्पिरीलम व स्फूरद विरघळवणाऱ्या जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.
  • पेरणी करताना ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश हलक्या जमिनीत तर मध्यम जमिनीत ५० किलो नत्र २५ किलो स्फूरद आणि २५ किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. पेरणीच्या वेळी अर्धे नत्र व संपूर्ण स्फूरद व पालाश आणि २५ ते ३० दिवसांनी अर्धे नत्र जमिनीत ओलावा असल्यास द्यावे. रासायनिक खते दोन चाडीच्या पाभरीने पेरून द्यावे.
  • सोयाबीन

  • पेरणीकरिता मध्यम काळी पोयट्याची, चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पेरणी खरिपात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वापशावर करावी. भारी जमिनीत पेरणी ४५ x ५ सें.मी. आणि मध्यम जमिनीत ३० x १० सें.मी अंतरावर करावी.
  • सलग पेरणीकरिता ७५-८० किलो प्रति हेक्टर तर टोकण करण्याकरिता ४५-५० किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. पेरणीकरिता जे.एस.३३५, एम.ए.सी.एस ११८८, फुले कल्याणी (डी.एस २२८), जे.एस ९३०५, कें.एस.१०३, फुले अग्रणी (केडीएस ३४४) आणि फुले संगम (केडीएस ७२६) या  जातींची निवड करावी. प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबियम व २५ ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
  • आंतरपिकामध्ये सोयाबीन + तूर (३:१) या प्रमाणात घ्यावे. सोयाबीन पिकास हेक्टरी ५० किलो नत्र, ७५
  • किलो स्फूरद आणि ४५ किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. खते पेरणीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावीत अथवा दोन चाड्याच्या पाभरीने खते व बियाणे एकाच वेळी पेरून द्यावे.
  • तूर

  • पेरणीकरिता लवकर तयार होणारे आयसीपीएल ८७, विपुला, फुले राजेश्वरी, बीडीएन ७११ या जातींची निवड करावी. लागवडीसाठी ९० x ६० सें.मी. अथवा १८० x ३० सें.मी. अंतर ठेवावे. याशिवाय बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३ हे मध्यम उशिरा येणाऱ्या जातींची निवड करावी. प्रती किलो बियाणास २५ ग्रॅम रायझोबियम व २५ ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
  • पेरणी करतेवेळी प्रति हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद म्हणजेच १२५ किलो डीएपी वापरावे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. हेक्टरी जातीपरत्वे १० किलो
  • बियाणे वापरावे. टोकण पद्धतीने पेरणी केल्यास बी कमी लागेल.
  • पिके  वाण  पेरणीचे अंतर (सें.मी.) हेक्टरी बियाणे (किलो)  नत्र (युरिया)    स्फुरद (एसएसपी)  पालाश (एमओपी)
    बाजरी    फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती, धनशक्ती  को.45 x 15 बा. 30 x 10      3-4   50 (104)    25 (156)      25 (42)
    सोयाबीन  जे.एस. 335, एमएसीएस 1188, फुले कल्याणी (डी.एस. 228) जे.एस.9305, कें.एस. 103, फुले अग्रणी (केडीएस 344) फुले संगम केडीएस (726)

    45 x 5

    30 x 10

    75-80 45-50 (टोकण) 50 (104) 75 (469) 45 (75)
    तूर आयसीपीएल 87, विपुला, फुले राजेश्‍वरी, बीडीएन 711 बीएसएमआर 736, बीएसएमआर 853 45 x 10 40 x 20 40 x 20 40 x 60 180 x 30 12-15 3-4 (टोकण) 25 (54) 50 (312) -

                          डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ (मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

    Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

    Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

    Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

    Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

    SCROLL FOR NEXT