तंत्रज्ञान वैशाखी मूग लागवडीचे
तंत्रज्ञान वैशाखी मूग लागवडीचे 
ॲग्रो गाईड

तंत्रज्ञान वैशाखी मूग लागवडीचे

डॉ. हनुमान गरुड, डॉ. भगवान आसेवार, श्रीमती सारिका नारळे

उन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी उत्तम असून, या काळात मुगाचे चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळी हंगामासाठी शिफारशीत सुधारीत वाणांची निवड करावी. मूग पिकाला मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन आवश्यक असते. या पिकाला जास्त मशागतीची आवश्यकता लागत नाही. एक हलकी नांगरट व वखराच्या दोन पाळ्या देऊन पेरणी करता येते. सुधारीत वाणांची निवड – उन्हाळी मुगाची पेरणी करण्यासाठी खालील वाणांची निवड करावी.

  • वाण ः कालावधी (दिवस) ः उत्पन्न (क्विं/हे.) ः प्रमुख वैशिष्ट्ये
  • कोपरगाव ः ६० ते ६५ ः ८-१० ः टपोरे हिरवे चमकदार दाणे
  • एस-८ ः ६० ते ६५ ः ९-१० ः हिरवे चमकदार दाणे, खरीप व रब्बी हंगामासाठी योग्य
  • फुले एम-२ ः ६० ते ६५ ः ११-१२ ः मध्यम हिरवे दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी
  • बीएम-४ ः ६० ते ६५ ः  १०-१२ ः मध्यम हिरवे दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी
  • पेरणी – वैशाखी मुगाची पेरणी १५ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान करावी. दोन ओळीतील अंतर ३० सें. मी. असावे. बी पेरणीपूर्वी रायझोबीयम व स्फुरद विरघळवणारे जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास चोळावे. प्रति हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे. खत व्यवस्थापन – मुगासाठी शेवटच्या वखरणीअगोदर ६-८ टन प्रति हेक्टरी शेणखत किंवा कंपोस्ट द्यावे. पेरणीच्या वेळी २० किलो नत्र आणि ४० -५० किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे. आंतरमशागत व तणनियंत्रण – हे पीक कमी कालावधीचे असल्याने उभ्या पिकामध्ये वेळीच आंतरमशागत करणे गरजेचे आहे. पेरणीनंतर ३ ते ४ आठवड्यांनी एक कोळपणी वा एक खुरपणी करून घ्यावी. त्यामुळे आंतरमशागतीसोबतच तणांचे नियंत्रण होण्यास मदत होते. पाणी व्यवस्थापन – उन्हाळी मुगासाठी पेरणीनंतर १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या एकूण ४ ते ५ पाळ्या द्याव्यात. पीक फुलावर येण्याच्या वेळी तसेच दाणे भरण्याच्या वेळी पाणी देणे आवश्यक असते. जेव्हा फक्त एकच पाणी उपलब्ध असेल त्या वेळी मात्र मुगास पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी पाणी द्यावे. डॉ. भगवान आसेवार, ९४२००३७३५९ (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे डॉ. गरुड हे वरिष्ठ संशोधन फेलो असून, डॉ. आसेवार हे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT