कृषी सल्ला
कृषी सल्ला 
ॲग्रो गाईड

कृषी सल्ला : ऊस, मका, भुईमूग, बाजरी, डाळिंब, आंबा, भाजीपाला

कृषी विद्या विभाग, राहुरी

      ऊस    

  • तुटून गेलेल्या ऊस क्षेत्रातील पाचट सरीत दाबून घ्यावे. या पाचटावर प्रति हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० किलो पाचट कुजविणारे जिवाणू वापरावेत. त्यानतर उसास पाणी द्यावे. जमीन ओली असताना सरीतील पाचट पायाने थोडे दाबून घ्यावे. त्यानतर १५ दिवसांच्या आत प्रति हेक्टरी ६.५ गोण्या युरिया, ९ गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट व ५ गोण्या म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. उर्वरित खतमात्रा १३५ दिवसांनी द्यावी.    
  • सध्याच्या वाढीच्या अवस्थेतील उसामध्ये पोंग्यातील पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे फवारणी करावी.
  •    मका    

  • अवस्था - वाढ    
  • पेरणीनंतर ४५ दिवसांनी हेक्टरी ४५.२ किलो युरिया द्यावा.
  • पाण्याची पाळी देतेवेळी जीवामृत एकरी २०० लिटर या प्रमाणात सोडावे.
  • सूर्यप्रकाश परावर्तीत होऊन पिकाच्या अंतरंगातून होणारी पाण्याची वाफ कमी करण्यासाठी पांढऱ्या खडूची पावडर १२० ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. यामुळे अवर्षण कालावधीत पिकाला पाण्याचा ताण सहन होण्यास मदत होते.
  • जमिनीत पडणाऱ्या भेगातून पाण्याचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात होते. ते कमी करण्याबरोबरच तणांचे नियंत्रण करण्यासाठी शेतात कोळपणी करून घ्यावी.    
  •     भुईमूग  

  • भुईमूग    फुलोरा    अमृतपाणी १५० मिलि/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • पिकाच्या वाढीसाठी ७० ग्रॅम ०० : ५२ : ३४ अधिक जास्त फुले सुटण्यासाठी नायट्रोबेंझीन ३० मिलि अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण ५० ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.    
  • उन्हाळी भुईमूग पिकास जमिनीच्या मगदुरानुसार ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे.     
  • भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यावर आंतरमशागत करू नये.
  • पाने खानारी अळी व पाने गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास,
  • त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
  • सायपरमेथ्रिन (२५ ई. सी.) ०.४ मिलि किंवा क्विनॉलफॉस (२५ ई.सी.) २ मिलि.     
  •     उन्हाळी बाजरी

  • पिकास जमिनीच्या मगदुरानुसार ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे.    
  • रब्बी पिकांची काढणी झालेल्या क्षेत्रात लगेच नांगरणी करावी. यामुळे शेतातील पिकांचा पडलेला पालापाचोळा व सेंद्रिय अवशेष इ. जमिनीत गाडले जातात.     
  •       लिंबूवर्गीय पिके सिट्र्स सायला रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) १ मिलि किंवा नोवालुरॉ (१० % प्रवाही) ०.५५ मिलि.     

       डाळिंब    फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी, ५ % निंबोळी अर्क किंवा निंबोळीयुक्त कीटकनाशक (ॲझाडिरेक्टिन १० हजार पीपीएम) २ मिलि प्रति लिटर पाणी मिसळून फवारावे.        

        पानवेल    फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी शेवरी, शेवगा आणि वेलीवर आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. डायमेथोएट १ मिलि प्रति लिटर पाणी.         साठविलेले धान्य साठविलेल्या धान्यात लिंबाचा पाला १ ते २ टक्के मिसळावा. वेखंड किंवा बोरीक पावडर भुकटी लावून (२-५ ग्रॅम प्रति किलो) या प्रमाणात मिसळावे. म्हणजे साठवणीतील किडींचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होते. साठविलेल्या धान्यातील किडींचा प्रादुर्भाव मुख्यत्वे करून त्यात असलेल्या ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. साठवणीसाठी धान्यातील ओलावा १० टक्क्यांपेक्षा कमी राहील अशी काळजी घ्यावी. त्यासाठी धान्य उन्हात चांगले वाळवावे.   

          भाजीपाला     ढगाळ हवामानामुळे भाजीपाला पिकांवर पाने खाणाऱ्या हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक किंवा झालेला असल्यास नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी क्लोरपायरीफॉस १.५ मिलि किंवा क्विनॉलफॉस १.५ मिलि किंवा प्रोफेनोफॉस १.५ मिलि. सूर्यफूल

  •  केसाळ अळ्यांच्या नियंत्रणासाठी एकत्रित खाणाऱ्या लहान अळ्यांचे पुजंके रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत किंवा क्विनॉलफॉस (१.५%) किंवा (१० % भुकटी) १०किलो प्रति एकर या प्रमाणात सकाळी वारा शांत असताना धुरळावी.    
  •  सूर्यफुलाचे पीक ११० दिवसांमध्ये तयार होते. सूर्यफुलाची पाने, देठ व फुलाची मागील बाजू पिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी. कणसे चांगली वाळवून नंतर मळणी करावी.     
  •      आंबा

  • आंब्याची फळे तयार होताना फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तो टाळण्यासाठी बागेत मिथील युजेनॉल (रक्षक) सापळे हेक्टरी ५ या प्रमाणात लावावेत.     
  • तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५% प्रवाही) ०.५ मिलि किंवा प्रोफेनोफॉस(५०% प्रवाही) १ मिलि.टीप - दुपारी कडक उन्हामध्ये फवारणी करू नये.
  •  : ०२४२६-२४३२३९ (ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

    Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    SCROLL FOR NEXT