भुरीचा प्रादुर्भाव
भुरीचा प्रादुर्भाव 
ॲग्रो गाईड

डाऊनी, भुुरीच्या प्रादुर्भावाची शक्यता

डॉ. एस. डी. सावंत

सर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या आठवड्यात शुक्रवार आणि त्यानंतर सर्वच ठिकाणी कमी जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे. सांगली, सोलापूर, पुण्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये शनिवारपासून ते मंगळवारपर्यंत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः सांगली विभागामध्ये सांगलीच्या दक्षिणेकडील भागात रविवारी आणि सोमवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस सर्व विभागांमध्ये म्हणजेच पळशी,खानापूर, विटा, तासगाव, पलूस, वाळवा परिसरात पाऊस होण्याची शक्यता आहे.अशाच प्रकारचा पाऊस पुणे जिल्ह्यातील यवत, पाटस, सुपे, बारामती या विभागामध्ये सोमवार, मंगळवारी होण्याची शक्यता आहे.   जोरात सुरू झालेला मॉन्सून या आठवड्यामध्ये मंदावलेला दिसत आहे. विशेषतः नाशिक विभागात या आठवड्यात फारश्या पावसाची शक्यता नाही.परंतू २३,२४ तारखेनंतर सर्वच विभागामध्ये मॉन्सून पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसात विशेषतः नाशिक, सोलापूर विभागांत होणाऱ्या पावसामुळे तापमानात बरीचशी घट झालेली आहे. २४ तारखेनंतरच्या पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढून कमाल तापमान बहुतांशी ३० अंश सेल्सिअच्या खाली जाण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ असा, की सध्याच्या हलक्या पावसामध्ये कदाचित डाऊनी मिल्ड्यूचा सर्वत्र प्रसार झालेला दिसणार नाही; परंतु २३, २४ तारखेनंतरच्या पावसामध्ये डाऊनी मिल्ड्यू कार्यरत होण्याची दाट शक्यता सर्वच विभागात दिसते.  म्हणून २० ते २२ तारखेच्या दरम्यान सर्व बागांच्यामध्ये डाऊनीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या घेणे फायद्याचे ठरेल.

शेंडा कापलेल्या बागांच्यामध्ये ताम्रयुक्त बुरशीनाशकाची (कॉपर हायड्रॉक्साईड २ ग्रॅम किंवा कॉपर आॅक्सिक्लोराईड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा बोर्डो मिश्रण अर्धा टक्का) फवारणी घ्यावी. पुढील ५ ते ६ दिवसांमध्ये पाऊस जरी कमी झाला तरी सर्व विभागांच्यामध्ये वातावरण ढगाळ रहाणार आहे. झालेल्या पावसामुळे वातावरणामध्ये आर्द्रता बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. अशा वातावरणामध्ये भुरी वाढण्याची शक्यता असते. बागेत फेरफटका घेऊन भुरीचा प्रादुर्भाव झालेली पाने दिसतात का ? हे तपासावे. प्रादुर्भावास थोडीशी सुरवात झालेली असल्यास लगेच सल्फर (८० डब्लूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

संपर्क : ०२०-२६९५६००१ राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT