भाजीपाला पिकांवरील कीड- रोगनियंत्रण
भाजीपाला पिकांवरील कीड- रोगनियंत्रण  
ॲग्रो गाईड

भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवार

डॉ. एम. एन. भालेकर, सी. बी. बाचकर, एस. ए. पवार

वाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी. नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी डायमेथोएट (३० इ.सी.) १.५ मि.लि. अधिक मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपरऑक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम टीप : हे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी आहे.

भेंडी : भेंडी या पिकात फळ पोखरणारी अळी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच हळदू या रोगाचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यांचे नियंत्रण करावे.

फळ पोखरणारी अळी : नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी क्विनॉलफॉस (२५ इ.सी.) २ मि.लि. किंवा डेल्टामेथ्रिन (२.८ इ.सी.) १ मि.लि. किंवा इमामेक्टीन बेंझोएट (५ डब्ल्यू.जी.) ०.४ ग्रॅम टीप : हे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी आहे.

हळदू रोग नियंत्रण लक्षणे व नुकसान : पानांच्या शिरा पिवळ्या पडतात. प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावून उत्पादनात घट होते. रोगप्रसारक कीड : रोगाचा प्रसार पांढरी माशी व तुडतुडे या किडींद्वारे होतो. त्यामुळे त्यांचे नियंत्रण करावे. फवारणी प्रतिलिटर पाणी पहिली फवारणी : थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यू. डी. जी.) ०.४ ग्रॅम दुसरी फवारणी : डायमेथोएट (३० इ.सी.) १ मि.लि. सूचना : दाेन फवारण्यांमध्ये दहा दिवसांचे अंतर ठेवावे. गवार या पिकात भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

भुरी लक्षणे व नुकसान : हा रोग लेव्हेलूला टावरीका नावाच्या बुरशीमुळे होतो. लागवडीनंतर साधारणत: ४५ दिवसांच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे सुरवातीला पानाच्या वरील बाजूला पांढरी पिठासारखी बुरशीची पावडर दिसून येते. रोगाचे प्रमाण वाढून पूर्ण पाने पांढरट दिसतात. या रोगाचा प्रादुर्भाव शेंगा व खोडावरही होतो. त्यामुळे पाने निस्तेज होऊन गळतात. शेंगांचा हिरवा रंग बदलून त्या तपकिरी रंगाच्या होतात. नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल २ मि.लि. फवारणीची वेळ : रोगाची लक्षणे दिसताच सूचना : गरजेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

संपर्क : डाॅ. एम. एन. भालेकर, ०२४२६-२४३३४२ (अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, भाजीपाला पिके, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT