खोडवा उसात तीक्ष्ण धारेच्या कोयत्याने जमिनीलगत बुडखा छाटणी करावी.
खोडवा उसात तीक्ष्ण धारेच्या कोयत्याने जमिनीलगत बुडखा छाटणी करावी. 
ॲग्रो गाईड

पीक व्यवस्थापन सल्ला

डॉ. यू. एन. आळसे, डी. डी. पटाईत, डॉ. एस. जी. पुरी

कापूस : पऱ्हाट्या लवकरात लवकर उपटून टाकाव्यात. उपटलेल्या पऱ्हाट्या शेतात तशाच न ठेवता जाळून नष्ट कराव्यात.

भुईमूग :

  • पेरणी जानेवारी महिन्यात केली असल्यास निंदणी कोळपणी करून तणाचे नियंत्रण करावे.
  • पिकास १० ते १२ दिवसांच्या अंतराने नियमित पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • तुषार पद्धतीने पाणी द्यावे.
  • मावा,तुडतुडे व पाने पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण फवारणी ः (प्रति लिटर पाणी) इमिडाक्‍लोप्रीड (१७.८ टक्के) ०.२५ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथीन (५ टक्के)०.६ मि.लि.

    सूर्यफूल :

  • पिकाची दाटी झाल्यास पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी विरळणी करावी. विरळणीनंतर एका ठिकाणी एक जोमदार व टवटवीत रोपटे ठेवावे.
  • १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या नियमित पाळ्या द्याव्यात.
  • पेरणीनंतर ३० दिवसांनी नत्राची मात्रा ३० किलो प्रतिहेक्टरी या प्रमाणात द्यावी.
  • उन्हाळी पिकावरील रसशोषक किडी व रब्बी पिकावरील केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी. तसेच पानावरील ठिपके रोगाचे नियंत्रण करावे.
  • परागसिंचन चांगले व्हावे यासाठी पीक फुलावर असताना तळहाताला पातळ कपडा बांधून सकाळी ८ ते १० वाजेच्या दरम्यान पिकाच्या फुलावरून हात फिरवावा. त्यामुळे फुलामधील दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.
  • रसशोषक कीड नियंत्रण (मावा, तुडतुडे, पांढरी माशी) फवारणी ः (प्रति लिटर पाणी) इमिडाक्‍लोप्रीड (१७.८ टक्के) ०.२ मि.लि.

    केसाळ अळी नियंत्रण अंडीपुंज तसेच अळ्यासहीत पाने तोडून रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवावीत. फवारणी ः (प्रति लिटर पाणी) निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अॅझाडिरॅक्टीन १०,००० पीपीएम २.५ मि.लि. किंवा सायपरमेथ्रीन (१० टक्के) १.३ मि.लि.

    पानावरील काळे ठिपके (अल्टरनेरीया) रोग नियंत्रण :   फवारणी ः (प्रति लिटर पाणी) मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम

    मूग : पेरणीपासून ४५ दिवसांपर्यंत पीक तणविरहीत ठेवावे. तीळ : पेरणीनंतर एक महिन्याने प्रतिहेक्टरी ५४ किलो युरिया द्यावा. ज्वारी :

  • बागायत ज्वारी पिकास दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे.
  • उशिरा पेरलेल्या ज्वारी पिकावर मावा किडीमुळे येणाऱ्या चिकटा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
  • मावा नियंत्रणासाठी फवारणी :  (प्रति लिटर पाणी) डायमेथोएट (३० टक्के) १ मि.लि. खोडवा ऊस :

  • ऊस तोडल्यानंतर पाचट जाळू नये. एक आड एक सरीत पाचट टाकावे. रिकाम्या सरीतून मशागत व खते द्यावीत.
  • तोडणी तीक्ष्ण धारेच्या कोयत्याने जमिनीलगत करावी.
  • तोडणीनंतर वरंब्याच्या बगला नांगराच्या साहाय्याने फोडून परत सऱ्या पाडाव्यात.
  • तोडणीनंतर १५ दिवसांनी हेक्‍टरी ७५ किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश सरीमध्ये द्यावे. खत दिल्यानंतर ताबडतोब पाण्याची पाळी द्यावी.
  • पाण्याच्या पाळ्या १२ ते १५ दिवसांच्या अंतराने द्याव्यात.
  • काणी रोगग्रस्त झाडे (मुळासहीत) उपटून नष्ट करावीत.
  • संपर्क : डी. डी. पटाईत, ७५८८०८२०४०, डॉ. यू. एन. आळसे, ०२४५२-२२९००० (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम

    Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

    Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

    Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

    Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

    SCROLL FOR NEXT