ॲग्रो गाईड

वाटाणा पीक सल्ला

डाॅ. एस. एम. घावडे

रब्बी हंगामात भरपूर आर्थिक उत्पन्न देणारे वाटाणा हे पीक आहे. नोव्हेंबर महिन्यात लागवड केलेले पीक सद्यस्थितीत फुलोरा अवस्थेत आहे. काही ठिकाणी शेंगा लागणीसही सुरवात झाली आहे. ज्या भागात मार्च महिन्यातही थंड वातावरण व सरासरी तापमान १० ते २० अंश सेल्सिअस राहते तेथे सद्यस्थितीतही त्वरित  लागवड केल्यास चालते. त्यानुसार नियोजन करावे.   

नवीन लागवड

  • लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. कसदार, रेतीमिश्रित (सामू- ५.५ ते ६.७) जमीन या पिकास अधिक मानवते.
  • लागवडपुर्व मशागतीला या पिकात खूप महत्त्व आहे. त्यासाठी जमिनीची एकवेळा नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. जमीन चांगली भुसभुशीत करून लागवड करावी.
  • सद्यस्थितीत लागवडीसाठी लवकर येणाऱ्या जातींची निवड करावी. उदा. असौजी, निटीओर, अर्लीबॅजर, आर्केल.
  • लागवडीसाठी सपाट वाफे किंवा सरी -वरंबे या पद्धतीचा अवलंब करता येतो.  सपाट वाफ्यात ६० सें.मी.x ७.५ सें.मी. अंतर ठेवून करावी. सरी वरंब्यावर लागवड करावयाची असल्यास ६० सें.मी. अंतरावर सऱ्या सोडाव्यात. सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने किंवा पाभरीने पेरणी करावी. टोकण पद्धतीने लागवड केल्यास रोपांमधील अंतर ७.५ सें.मी. ठेवावे. टोकण पद्धतीने हेक्टरी २० ते २५ किलो तर पाभरीने पेरणीसाठी हेक्टरी ५० ते ७५ किलो बियाणे लागते.
  • वाटाणा या पिकाला प्रतिहेक्टरी १५ ते २० टन शेणखत पेरणीपूर्वी जमिनीत चांगले मिसळून द्यावे. रासायनिक खतमात्रा देताना प्रतिहेक्टरी २० ते ३० किलो नत्र, ५० ते ६० किलोे स्फुरद आणि ३० ते ४० किलो पालाश द्यावे. पेरणी करताना संपूर्ण स्फुरद व पालाश तसेच निम्मे नत्र द्यावे. नत्राची उर्वरित मात्रा पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावी.
  • नोव्हेंबर-डिसेंबरमधील लागवडीसाठी  

  • गरजेनुसार खूरपणी करून तणनियंत्रण करावे. खुरपणीमुळे जमीन भुसभुशीत राहण्यासही मदत मिळते.
  • सद्यस्थितीत वाढत्या थंडीच्या काळात पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव होण्यास अनुकूल वातावरण आहे. त्यादृष्टिकोनातून नियोजन करावे.  
  • वाटाण्याच्या शेंगा पक्व होताना त्यांचा हिरवा रंग बदलत जाऊन फिकट होतो. हिरवट गोलाकार शेंगा दर दोन ते तीन दिवसांनी काढणीस तयार होतात. शेंगांची काढणी लागवडीखालील क्षेत्राचा अंदाज घेऊन २ ते ४ आठवड्यांत पूर्ण करावी. काढणीचा पूर्ण हंगाम ३ ते ४ तोडण्यांमध्ये आटोपेल असे नियोजन करावे.
  • पाणी व्यवस्थापन

  • नवीन लागवडीत बी पेरल्याबरोबर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार ६-८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • सद्यस्थितीत फुले लागण व शेंगा लागण झालेल्या पिकास योग्य पाणी व्यवस्थापन आवश्‍यक आहे. अशा काळात फुले आल्यापासून शेंगाचा बहर पूर्ण होईपर्यंत ६-८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • पीक संरक्षण रोगनियंत्रण भुरी

  • नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी  
  • विद्राव्य गंधक २ ग्रॅम  
  • मर रोग नियंत्रण :

  • पेरणीपूर्वी बियांना थायरम २.५ ते ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.  
  • वारंवार एकाच जमिनीवर वाटाणा हे पीक न घेता पिकांची फेरपालट करावी.
  •   कीड नियंत्रण शेंगा पोखरणारी अळी नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर

  • निंबोळी अर्क ५ टक्के किंवा
  • अझाडिरॅक्टीन (१० हजार पीपीएम) ५ मि.लि. किंवा
  • क्विनाॅलफाॅस (२५ टक्के) १.६ मि.लि.
  • आवश्‍यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी व तिसरी फवारणी करावी.
  • मावा/तुडतुडे/फुलकिडे : नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर

  • निंबोळी अर्क - ५ टक्के किंवा
  • अॅझाडिरॅक्टीन (१० हजार    पीपीएम) ३ मि.लि. किंवा
  • डायमेथोएट (३० टक्के) १ मि.लि.
  • आवश्‍यकतेनुसार १५ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
  • संपर्क :  डाॅ. एस. एम. घावडे, ९६५७७२५८४४ (मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

    Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

    Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

    Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

    Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

    SCROLL FOR NEXT