भुईमूग पिकाचे स्पॅनिश आणि व्हर्जिनिया असे प्रमुख प्रकार आहेत. स्पॅनिश प्रकारच्या जातीचा पक्व काळ लवकर आणि व्हर्जिनिया प्रकारच्या जातीचा पक्व काळ उशिरा असतो. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यानंतर लागवडीस सुरवात करावी.
पीक वाढीच्या अवस्था
पीक वाढीच्या अवस्थेत तापमानाचा परिणाम बियाणे उगवण जमिनीतील तापमानाचा परिणाम बियाणे उगवण, अंकुर व रोप वाढीवर होतो. जमिनीतील तापमान १५ अंश सेल्सिअस आणि वातावरणातील तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक अनुकूल असते. यापेक्षा तापमान कमी असल्यास उगवण उशिरा व कमी होते. वातावरणातील तापमान ५४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास बियाणातील भ्रूण मरतो. उगवण होत नाही.
रोप वाढ वातावरणातील २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानामध्ये रोपाची वाढ जलद गतीने होते.
फूलधारणा वातावरणातील तापमान २४ ते २७ अंश सेल्सिअसमध्ये असल्यास फूलधारणा अधिक प्रमाणात होते. वातावरणातील तापमान सतत ३३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्यास फुलातील पराग कणांच्या सजीव क्षमतेवर परिणाम होतो. फुलामध्ये वंध्यत्व (वांझपणा) येते. त्यामुळे शेंगधारणा होत नाही.
शेंगधारणा जमिनीतील तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअसमध्ये शेंगाची वाढ व पोषण चांगले होते. फूलधारणा ते पक्वता या कालावधीत जमीन व वातावरणातील तापमानात वाढ झाल्यास शेंगाच्या संख्येत घट होते.
सूर्यप्रकाशाचे महत्त्व भुईमूग पिकास भरपूर सूर्यप्रकाश मानवतो. सूर्यप्रकाशाचा पानांचे प्रकाश संश्लेषण आणि श्वासोच्छवासावर परिणाम होतो. दिवसा सूर्यप्रकाश कालावधी दहा तास असल्यास झाडाची वाढ जोमदार होते. अधिक तासाच्या दिवसामध्ये झाडांना फूलधारणा कमी होते. स्वच्छ व निरभ्र सूर्यप्रकाश असल्यास फूल व आऱ्यांच्या संख्येत वाढ होते. शेंगांमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण वाढते, दाणे आकर्षक होतात. उत्पादनात वाढ होते.
गेल्या वर्षीतील तापमानाचा परिणाम
संपर्क : डी. एम. काळे, ९९३०७५७२२५ (लेखक भुईमूग शास्त्रज्ञ आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.