संत्रा बागेत डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव  
ॲग्रो गाईड

फळपीक सल्ला : लिंबूवर्गीय फळ, केळी

डॉ. यू. एन. आळसे, डी. डी. पटाईत, डॉ. एस. जी. पुरी

लिंबूवर्गीय फळ पीके

  • मृग बहराची फळे काढणी झाली नसल्यास बागेस ७ ते ८ दिवसांच्या अंतराने दुहेरी बांगडी पद्धतीने पाणी द्यावे. अतिभारी जमिनीत लागवड केलेल्या बागेत मृग बहरासाठी १५ एप्रिलनंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ताण सुरू करावा. हलक्या मध्यम जमिनीत १ मे नंतर ताण सुरू करावा.
  • बागेस सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त मिश्रण ग्रेड - २ची २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
  • अपक्व फळे (किंवा हिरवी) झाडावर असतील, तर झाडावर पोटॅशियम नायट्रेट १५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. गरज भासल्यास दुसरी फवारणी १० दिवसांच्या अंतराने करावी.
  • बागेतील लहान फळांची गळ होऊ नये म्हणून बागेस पाण्याचा ताण पडू देऊ नये. तसेच एन. ए. ए. १५ पीपीएम (१५ मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) व युरियाची ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. दहा वर्षांपूर्वीच्या बागेस २५० ते ३०० ग्रॅम व त्यापेक्षा जास्त वयाच्या बागेस प्रतिझाड ५०० ग्रॅम नत्र द्यावे.
  • पाणी टंचाई असल्यास अाळ्यामध्ये वाळलेले गवत, पाचट यांचे आच्छादन करावे.
  • आंबे बहराची फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यानंतर प्रतिझाड ४०० ग्रॅम नत्र द्यावे.
  • पिकावर डिंक्या, फळसड आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अाहे. त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.
  • अ) डिंक्या रोग नियंत्रण :

  • प्रथम झाडाच्या खोडाला इजा न होता डिंक्या असलेला चिकट भाग खरडून काढावा. त्यानंतर त्यावर बोर्डोपेस्टचा (१० टक्के) लेप लावावा.
  • फवारणी प्रतिलिटर पाणी मेटॅलॅक्झिल अधिक मँकोझेब संयुक्त बुरशीनाशक - २.५ ग्रॅम
  • टीप : जमिनीवर फोसेटील ए. एल. २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • ब) फळसड राेग नियंत्रण फवारणी प्रतिलिटर पाणी मेटॅलॅक्झिल अधिक मँकोझेब संयुक्त बुरशीनाशक - २.५ ग्रॅम केळी :

  • बागेस ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • केळीची बांधणी केली नसल्यास करून घ्यावी. केळीचा घड किंवा घडाचा दांडा यांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना केळीच्या पानांनी झाकावे.
  • जोराच्या वाऱ्यापासून तसेच उष्णतेपासून बागेचे संरक्षण करण्यासाठी बागेभोवती वाराप्रतिबंधक झाडे किंवा शेवरीची झाडे लावावीत. केळी सभोवती मका, गजराज किंवा इतर वाराप्रतिबंधक झाडे लावली नसल्यास दक्षिण-पश्‍चिम बाजूने तुराट्या लावाव्यात. पाण्याची कमतरता असल्यास बागेवर ७ टक्के केओलिनची (७० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी.
  • सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये लागवड केलेल्या बागेस युरिया ६५ ग्रॅम व म्युरेट आॅफ पोटॅश १०० ग्रॅम प्रतिझाड याप्रमाणात खतमात्रा द्यावी.
  • पिकावर करपा (पानावरील काळे ठिपके) या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करावी.
  • अ) करपा रोगनियंत्रण : फवारणी प्रतिलिटर मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक सरफेक्टंट १ मि.लि.

    संपर्क : डॉ. यू. एन. आळसे, ०२४५२-२२९००० (कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Monsoon Impact: कधी दुष्काळ तर धो-धो पाऊस का बरसतो?

    Agriculture Degree Admission: कृषी पदवीसाठी अर्ज भरण्यास रविवारपर्यंत मुदतवाढ

    Harshvardhan Sapkal: कृषिमंत्र्यांची हकालपट्टी करा

    Krushi Samruddhi Scheme: भांडवली गुंतवणुकीची ‘कृषी समृद्धी’ जाहीर

    Rummy Viral Video: रमी खेळल्याचा आरोप बिनबुडाचा

    SCROLL FOR NEXT