कोबीवरील करपा रोग
कोबीवरील करपा रोग  
ॲग्रो गाईड

कोबीवर्गीय पिकांवरील रोगांचे नियंत्रण

चिमाजी बाचकर, सोमनाथ पवार

सद्यःस्थितीत कोबीवर्गीय पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. ढगाळ वातावरण, कमी-जास्त होणारी थंडी अशा वातावरणात मुळावरील गाठी, करपा, केवडा, भुरी आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. रोगाची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.

मुळावरील गाठी (क्लब रुट) : लक्षणे :

  • प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून सुकतात. गड्डे लहान आकाराचे येतात.
  • मुळावर गाठी आलेल्या दिसतात. मुख्य खोडाचा भाग फुगीर, खुरटा आणि काळसर पडून कुजतो.
  • जमिनीचा सामू ७ पेक्षा कमी आहे, अशा जमिनीत रोगाचे प्रमाण जास्त असते.
  • नियंत्रण :

  • रोगट झाडे उपटून त्यांचा नायनाट करावा.
  • कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आळवणी.
  • करपा (ब्लॅक लिफ स्पॉट) : लक्षणे  :

  • रोगाचा प्रादुर्भाव बियाणे व रोगग्रस्त अवशेषांपासून होतो. प्रसार कीटक आणि हवेमार्फत होतो.
  • प्रादुर्भावग्रस्त गड्डा, देठ आणि खोडावर गोलाकार किंवा लंबगोल काळसर रंगाचे डाग दिसतात. पानावर एकात एक वलये असलेले तपकिरी काळे ठिपके पडतात.
  • ढगाळ हवामानात रोगाची तीव्रता वाढून हे डाग एकमेकांत मिसळतात. सर्व भाग काळपट पडून पाने करपल्यासारखी दिसतात.
  • कोबी, फ्लॉवरच्या गड्ड्यांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन गड्डे तपकिरी रंगाचे होतात.
  • रोगग्रस्त झाडांचा उपटून नायनाट करावा.
  • फवारणी (प्रति लिटर पाणी) मँकोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर आॅक्‍सिक्‍लोराइड २.५ ग्रॅम किंवा क्‍लोरथॅलोनील २.५ ग्रॅम अधिक सर्फेक्‍टंट १ मि.लि.
  • केवडा (डाऊनी मिल्ड्यू) : लक्षणे :

  • रोगाचा प्रादुर्भाव बियाणे आणि जमिनीतून होतो. तसेच रोगग्रस्त झाडाचे अवशेष, पाणी व वाऱ्यामार्फत दुय्यम प्रसार होतो.
  • रोगामुळे पानाच्या वरील भागावर पिवळसर रंगाचे तर खालील भागावर जांभळट, तपकिरी रंगाचे डाग दिसून येतात. सदर डागांवर नंतर भुरकट बुरशीची वाढ होते.
  • प्रादुर्भाव रोपावस्थेत जास्त प्रमाणात होतो. पोषक वातावरणात संपूर्ण पाने करपून रोपे मरतात.
  • पुनर्लागवडीनंतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पाने गळतात. त्यामुळे गड्डे चांगले पोसत नाहीत. गड्ड्यांची काढणी लांबल्यास त्यावर तपकिरी काळपट चट्टे पडतात आणि ते सडू लागतात.
  • फुलकोबीचा मुख्य दांडा व आतील भाग काळा पडून सडतो.
  • पीक स्वच्छ तणविरहित ठेवावे.
  • फवारणी (प्रति लिटर पाणी)    मेटॅलॅक्‍झिल अधिक मँकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा  क्‍लोरथॅलोनील २.५ ग्रॅम अधिक सर्फेक्‍टंट २ मि.लि.
  • संपर्क : चिमाजी बाचकर, ९४०४६१२४६१ (अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

    Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

    Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

    Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

    Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

    SCROLL FOR NEXT