ग्राफ्टेड द्राक्ष लागवडीचा 'एयर प्रुनिंग' अाविष्कार
ग्राफ्टेड द्राक्ष लागवडीचा 'एयर प्रुनिंग' अाविष्कार 
ॲग्रो गाईड

ग्राफ्टेड द्राक्ष लागवडीचा 'एयर प्रुनिंग' अाविष्कार

ज्ञानेश उगले

यंत्राच्या साह्याने द्राक्ष वाणाची काडी आणि रुटस्टॉकची काडी एकमेकाला जोडून एकजीव होते. प्रयोगशाळेत ठराविक तापमानात त्या काडीला मुळ्या फुटतात. त्यानंतर सात ते आठ दिवसात रोप पूर्ण तयार होते. त्यामुळे हव्या त्या वाणाच्या कलमी रोपांची लागवड थेट शेतामध्ये करता येते.

प्रचंड वेळखाऊ अशा पारंपरिक प्रक्रियेने कलम करणाऱ्या अनेक द्राक्ष उत्पादकाचा यावर विश्‍वासही बसणार नाही. मात्र हे नवीन तंत्रज्ञान द्राक्ष शिवारात नुकतेच दाखल झाले असून, वेळेमध्ये बचत होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील नानज येथील आशिष काळे यांनी हे एअर प्रुनिंग तंत्रज्ञान भारतात प्रथमच वापरले आहे. चिली, दक्षिण अाफ्रिका, न्यूझीलंड या देशांमध्ये हे तंत्रज्ञान मागील २५ वर्षांपासून वापरात असले तरी त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून काळे यांनी त्यात भारतीय परिस्थितीनुसार काम केले आहे. या पद्धतीने नाशिक, सोलापूर भागांतील काही शेतकऱ्यांनी यंदा लागवडही केली आहे.

पारंपरिक पद्धतीतील समस्या ः पारंपरिक पद्धतीमध्ये जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत रुटस्टॉक रोपांची लागवड केली जाते. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात त्यावर कलम (ग्राफ्टिंग) केले जाते. यामध्ये वेल पूर्ण तयार होऊन उत्पादन सुरू होण्यास दोन वर्षे लागतात. या नव्या पद्धतीत पूर्णपणे ग्राफ्ट केलेले रोपच लागवड केले जात असल्याने पहिल्याच वर्षापासून उत्पादन सुरू होते. या पूर्वीही ग्राफ्टेड रोपांची लागवड काही ठिकाणी होत असली तरी त्यासाठी रोपवाटिका करणाऱ्यास आधी एक वर्षापासून तयारी करावी लागे. हा कालावधी आणि खर्चाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आधी रुटस्टॉक व नंतर सहा ते आठ महिन्यांनी ग्राफ्टिंग करण्याकडेच शेतकऱ्यांचा कल राहिला आहे. असे आहे द्राक्ष कलमी रोपाचे तंत्रज्ञान ः

  • या नव्या तंत्रज्ञानात ग्राफ्टिंगसाठी यंत्रांचा वापर केला जातो. त्यामुळे ते १०० टक्के एकजीव होते. इतकेच नव्हे तर त्यांना लवकर मुळ्या फुटण्यासाठी प्रयोगशाळेत योग्य त्या तापमानाची सोय केली जाते. यामुळे वेळेमध्ये प्रचंड बचत होते.
  • बेंगलोर डॉग्रीजच्या स्टम्प (काडी)वर यंत्राने इंग्रजी व्ही अक्षराप्रमाणे खाच करून, त्यावर यंत्राने बेंच ग्राफ्ट केले जाते. त्यानंतर ठराविक तापमान व आर्द्रता असलेल्या एका चेंबरमध्ये रुटस्टॉक आणि सायन एकजीव करण्याची प्रक्रिया केली जाते. तिला ‘कॅलसिंग’ असे म्हणतात. त्याच वेळी काडीच्या खालच्या बाजूला कोकोपीट असलेले प्लग लावले जातात. त्यामुळे तिथे मुळ्या फुटतात. ती मुळी पुढील ३० दिवसात विकसित केली जाते. त्यानंतर पुढील आठ दिवस बाह्य वातावरणाची सवय करण्यासाठी प्रयत्न केले जातात. अशी ३८ दिवसांत ग्राफ्टिंगची प्रक्रिया पूर्ण होऊन रोप लागवडीयोग्य होते.
  • पारंपरिक पद्धतीशी तुलनात्मक एअर प्रुनिंग ठरते फायदेशीर ः १) या प्रक्रियेत रुट आणि वाणाची काडी सर्व बाजूने एकरुप होते. मुळीने घेतलेले अन्न १०० टक्के पानांपर्यंत जाते. पानाने तयार झालेले अन्न पूर्णपणे मुळीपर्यंत जाते पारंपरिक प्रचलित पद्धतीत ही प्रक्रिया ३० ते ४० टक्केच होते. शिवाय कलम पूर्णपणे एकजीव होण्यासाठी सुमारे १६० दिवसांचा कालावधी लागतो. २) १०० टक्के सक्रिय मुळ्या मिळविणे शक्‍य झाले आहे.  या रोपांमध्ये २० टक्केच सक्रिय मुळे असतात. ३) यात बेंगलोर डॉग्रीजची काडी कमीत कमी ७ मिलीमीटर असते. प्रचलित पद्धतीत ही काही ३ ते ४ मि.मी. असते. ४) या पद्धतीत सातत्याने फुटी काढण्याचा त्रास वाचतो.  बेंगलोर डॉग्रीजमधील डोळे प्रचलित पद्धतीत काढून टाकलेले असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार खालील फुटी काढण्याचा त्रास होतो. एअर प्रुनिंग टेक्‍नॉलॉजीने मुळ्यांची वाढ

  • या तंत्रज्ञानाला "एअर प्रुनिंग टेक्‍नॉलॉजी' म्हणून ओळखले जाते. यात रोपाची मुळीची जागा असते. ती एका कपाने आच्छादिलेली असते. त्यातून मुळी बाहेर येत असताना हवा लागल्यानंतर शेंडा थांबतो. म्हणून काडीपासून परत दुसरी मुळी फुटते. या स्थितीत खालच्या बाजूला अशा २५ ते ५० मूळ्या आलेल्या असतात. ज्या वेलीच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ठरतात.
  • प्रचलित पद्धतीत नर्सरी मातीतून गेलेले रोप लागवडीला दुसऱ्या मातीत जाते. यात नव्या मातीमुळे अडचणी येऊ शकतात. मात्र, नव्या तंत्रज्ञानामध्ये मातीऐवजी निर्जंतुक केलेल्या कोकोपीटचा वापर केलेला असतो. बुरशीच्या प्रादुर्भावाची शक्यता राहत नाही. तसेच या रोपाच्या मुळ्या कुठल्याही मातीला स्वीकारतात. नर्सरीतून रोप आणणे व लागवड करणे यासाठी प्रचलित पद्धतीत रोपाला प्रत्येकी १५ ते २० रुपये खर्च येतो. या नव्या पद्धतीत हा खर्च ३ रुपये इतका येतो. हे रोप शेतात आणल्यानंतर लागवडीसाठीच्या मजुरांची बचत होते.
  • चिली, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड या देशांत मागील २५ वर्षांपासून हे एअर प्रुनिंग टेक्‍नॉलॉजीचे तंत्रज्ञान वापरले जाते. भारतात मागील एक वर्षापासून याचा वापर सुरू झाला आहे. विजापूर येथील हृषिकेश सरदेशपांडे हे या तंत्रज्ञानाचा मागील दहा वर्षांपासून अभ्यास करीत आहेत. त्यासाठी त्यांनी चिली, न्यूझीलंड या देशातून प्रशिक्षण घेतले आहे. नानज (सोलापूर) येथील प्रयोगशील द्राक्ष उत्पादक आशिष काळे यांनी या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा भारतात द्राक्षांमध्ये वापर केला आहे. ज्येष्ठ द्राक्ष उत्पादक विभाकर पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. संपर्क : आशिष नानासाहेब काळे, ९४२०६३६४१७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

    Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

    River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

    Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

    Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

    SCROLL FOR NEXT