Cow Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Cow Milk Rate : गाय दूध अनुदानासाठी जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभागाला मदतीचे आवाहन

Cow Milk Subsidy : सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना गाय दूधपुरवठा करणाऱ्या उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले.

sandeep Shirguppe

Kolhapur Collector Office : शासनाने गाय दुधासाठी प्रतिलिटर जाहीर केलेले पाच रुपयांचे अनुदान देण्यासाठी जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग व पशुसंवर्धन दवाखाने यांचा सहभाग मिळावा, अशी मागणी संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

अध्यक्ष डोंगळे यांनी दिलेल्या निवदनात दिलेल्या माहितीनुसार, 'सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना गाय दूधपुरवठा करणाऱ्या उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान बँक खात्यावर थेट वर्ग (डी.बी.टी) केले जाणार आहे. यासाठी संबंधित सहकारी संस्थेने दुधाचे बिल ऑनलाईन देणे बंधनकारक आहे.

जनावरांची नोंदणी ईअर टॅगद्वारे व आधार लिंक भारत पशुधन पोर्टलवर करणे बंधकारक आहे. त्याअनुषंगाने गोकुळतर्फे ऑनलाईन बिल आदा, जनावर नोंदणी आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

योजनेच्या कामात पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषद यंत्रणाही सक्रिय कराव्यात; अशीही मागणी केली. यावेळी दूध संघाचे संचालक अजित नरके, अभिजित तायशेटे, सहाय्यक निबंधक दुग्ध प्रदीप मालगावे उपस्थित होते.

१६ ला आढावा बैठक

दरम्यान जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी संबंधित विभागांना कामात सक्रिय होण्याच्या सूचना केल्या. १६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालय येथे दूध संघ प्रतिनिधी, जिल्हा सहाय्यक निबंधक अधिकारी दुग्ध, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक घेतली जाईल. असेही सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Administration Failure: गतिमान प्रशासन (!)

Mango Season: पावसामुळे सिंधुदुर्गात आंबा हंगाम महिनाभर लांबणार

Banana Market: खानदेशात केळीची आवक कमी कमाल दर ७०० रुपये प्रति क्विंटल

Soybean Procurement: सोयाबीन खरेदी १५ नोव्हेंबरपासून पणनमंत्री रावल : आजपासून नोंदणी

Bacchu Kadu: लोकन्यायालयाचा निर्णय मानणार: बच्चू कडू

SCROLL FOR NEXT