Agriculture Development Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Development : कृषी क्षेत्रामध्ये झांबियाची वाढतेय गुंतवणूक

Zambia Agriculture : झांबिया देशाचा भूभाग प्रामुख्याने समशीतोष्ण असून येथे पर्वत, जंगल परिसर आणि पठारी भाग आहे. या देशाची अर्थव्यवस्था मुख्यतः खाणकाम, कृषी, आणि पर्यटनावर आधारित आहे. या देशात प्रामुख्याने कापूस, ऊस, मका, भात, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांची व्यावसायिक शेती केली जाते.

Team Agrowon

डॉ.एम.एस.पोवार

Agriculture Innovation : झांबिया हा आफ्रिकेतील महत्त्वाचा देश. याची भौगोलिक स्थिती आफ्रिका खंडाच्या मध्यभागी आहे. या देशाची राजधानी लुसाका आहे. हा देशाच्या सीमारेषा प्रामुख्याने डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉँगो, टांझानिया, मालावी, मोझांबिक आणि झिम्बाब्वे या देशांशी जोडलेल्या आहेत. या देशामध्ये अनेक नद्या आणि धबधबे आहेत. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असणारा व्हिक्टोरिया धबधबा या देशात आहे. देशाचा भूभाग प्रामुख्याने समशीतोष्ण असून येथे पर्वत, जंगले आणि पठारी भाग आहे. झांबियाची अर्थव्यवस्था मुख्यतः खाणकाम, कृषी, आणि पर्यटनावर आधारित आहे. या देशात तांबे, कोळसा, आणि इतर खनिजांच्या मोठ्या खाणी आहेत.

कृषी क्षेत्रातील प्रगती

झांबियामध्ये कृषी क्षेत्र हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. देशात विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते, ज्यामध्ये मुख्यतः कापूस, मका, भात, सोयाबीन, आणि भाजीपाला यांचा समावेश आहे. झांबियामध्ये मका हा मुख्य अन्नपदार्थ आहे, त्यामुळे या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भात देखील एक महत्त्वाचे पीक असून, मुख्यतः उत्तरेतील भागात भात शेती मोठ्या प्रमाणात आहे. कापूस, ऊस ही महत्त्वाची व्यापारी पिके आहेत. विशेषतः तेल उत्पादनासाठी सोयाबीन लागवड या देशात वाढत आहे. येथील शेतकरी पारंपारिक पद्धतींचा वापर करतात, परंतु अलीकडे यांत्रिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे. येथील सरकारने कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली आहे. त्यासाठी विविध योजनांची आखणी करण्यात आली आहे. याचा पीक उत्पादन वाढीसाठी मदत मिळाली आहे.

झांबियामध्ये आधुनिक पद्धतीने पीक लागवड असणाऱ्या व्यावसायिक फार्मवर पिव्होट सिंचन प्रणालीचा केला जातो. ही सिंचन प्रणाली विशेषतः फळबागा, पीक लागवडीच्या गोलाकार क्षेत्रात पाण्याचे समांतर वितरण करते. ही प्रणाली एक केंद्र बिंदूभोवती फिरते, ज्यामुळे पाणी समान रीतीने आणि प्रभावीपणे वितरित होते. याचे आर्म्स सामान्यतः १०० ते ६०० फूट लांब असतात. यामुळे एका गोलाकार क्षेत्रात पाणी पुरवठा केला जातो. आधुनिक यंत्रणेमध्ये स्वयंचलित पद्धतीने नियंत्रण करणारी यंत्रणा आहे.

यामुळे समान पद्धतीने पाण्याचे वितरण होते. पिकांच्या आवश्यकतेनुसार अचूक पाण्याची मात्रा दिली जाते. या प्रणालीद्वारे पाण्याचा वापर अधिक कार्यक्षमतेने होतो, ज्यामुळे कमी पाण्यातही चांगले उत्पादन मिळते. पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यात मदत करते. नियमित पाणी पुरवठ्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते. उपलब्ध पाण्यात विविध प्रकारच्या पिकांची लागवड करणे शक्य होते. उच्च उत्पादनामुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर मिळत आहेत. या प्रणालीच्या उभारणीसाठी प्रारंभिक गुंतवणूक खूप जास्त आहे. या देशातील व्यावसायिक फार्म या प्रणालीचा वापर कापूस,ऊस, मका या पिकांसाठी करत आहेत.

वाणिज्य आणि शेतीसंबंधी आव्हाने

बहुंताश देशांप्रमाणे झांबियामधील शेतकऱ्यांना देखील हवामान बदलाचा फटका बसू लागला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील किमतीतील अस्थिरता यामुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्याशिवाय, पीक उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनसंपत्तींचा अभाव हा देखील एक मोठा प्रश्न आहे.देशातील काही भागात शेतीसाठी आवश्यक पाण्याची कमतरता आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि नवीन पद्धतींचा वापर न करणारे शेतकरी उत्पादनात कमी पडतात.अजुनही या देशात वित्तीय सेवांचा अभाव आहे.तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे गुंतवणूक करण्यास अडचणी येत आहेत.हवामान बदलाचा पीक उत्पादनावर परिणाम दिसत आहे. योग्य प्रशिक्षित मजुरांची कमतरता आणि उच्च मागणी यामुळे उत्पादन प्रक्रियेत अडथळे येत आहेत. जैविक विविधतेचा अभाव, एक पीक पद्धतीमुळे जमिनीतील पोषक तत्त्वांची कमतरता दिसत आहे.

व्यावसायिक संधींना चालना

झांबिया देशातील पीक उत्पादनासाठी अनुकूल हवामान आणि जमीन लक्षात घेता हा देश व्यावसायिक कृषी फार्मसाठी एक आकर्षण ठरला आहे.या देशात विविध पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यादृष्टीने सरकारनेदेखील पुढाकार घेतला आहे. कृषी उद्योगासाठी लागणारी साधने, नवीन तंत्रज्ञान, आणि व्यावसायिक संधीमुळे येथील कृषी क्षेत्रात दरवर्षी गुंतवणूक वाढत आहे. स्थानिक सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी या देशातील शेतकरी तसेच कृषी विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. याव्यतिरिक्त शेतकरी तसेच कृषी विकासासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात.

यामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापर करून उत्पादन वाढवण्यास मदत मिळाली आहे. या देशातील व्यावसायिक कृषी फार्मचे सरासरी क्षेत्रफळ विविध प्रकारची शेती आणि प्रदेशानुसार बदलते. सामान्यतः, व्यावसायिक फार्म १०० हेक्टर्स पासून १,००० हेक्टर्स पर्यंत आहेत. विशेषतः मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन आणि पशुपालनासाठी लागणारे मोठे फार्म या देशात आहेत. या फार्मचे क्षेत्रफळ पीक लागवड, उपलब्ध संसाधने आणि बाजारातील मागण्यावर अवलंबून असते. या देशामध्ये सुमारे ५०,००० व्यावसायिक कृषी फार्म आहेत. या फार्ममध्ये ऊस, मका, सोयाबीन, कापूस, फळपिके आणि भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात आहे. येथील सरकारच्या कृषी विकासाच्या धोरणांमुळे आणि गुंतवणुकीमुळे फार्मच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते.

डॉ.एम.एस.पोवार ७०२८०१४५४६ (वरिष्ठ विपणन व्यवस्थापक, इफको, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Minister Shivraj Singh Chauhan : हरियाणामध्ये पिकांचे अवशेष जाळण्याच्या प्रकरणात २०१७ च्या तुलनेत ५१ टक्के घट : कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

Waqf Board : कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा; शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याचा इशारा

Water Storage : अनेक प्रकल्पांची तहान कायम; उपयुक्त पाणीसाठा ९१ टक्क्यांवर

Book Review : जगणं नव्याने जगताना...

Healthy Millets : नवधान्यांची समृद्धी

SCROLL FOR NEXT