Agriculture Minister Shivraj Singh Chauhan : हरियाणामध्ये पिकांचे अवशेष जाळण्याच्या प्रकरणात २०१७ च्या तुलनेत ५१ टक्के घट : कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

Crop Residue Burning in Haryana : पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सतत पिकांचे अवशेष जाळण्याच्या घटना समोर येत आहेत. दिल्लीत हवेचे प्रदुषण वाढले असून यावरून सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
Shivraj Singh Chauhan On Crop Residue Burning in Haryana
Shivraj Singh Chauhan On Crop Residue Burning in HaryanaAgrowon
Published on
Updated on

Pune News : पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सतत पिकांचे अवशेष जाळण्याचे प्रकार समोर येत आहेत. याबाबत आता सर्वोच्च न्यायालयानेच थेट पंजाब आणि हरियाणा सरकारला पिकांचे अवशेष जाळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी (ता.२६) पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ज्यात त्यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना करताना, हरियाणामध्ये पिकांचे अवशेष जाळण्याच्या प्रकरणात २०१७ च्या तुलनेत ५१ टक्के घट झाल्याचे म्हटले आहे.

या आभासी बैठकीला केंद्रीय वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीचे कृषी मंत्री, दिल्लीचे वन पर्यावरण मंत्री, मुख्य सचिवांसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

देशभरात सध्या अनेक पिकांची कापनी केली जात आहे. त्यानंतर शिल्लक असणाऱ्या अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी आग लावली जाते. यामुळे हवेच्या प्रदुषणाची समस्या समोर येत आहे. दिल्लीतील प्रदूषणाची पातळी वाढण्यामागचे कारणही पिकांचे अवशेष जाळण्याचे आहे. यासंदर्भात शनिवारी (ता.२६) केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पिकांचे अवशेष जाळणाऱ्या राज्याचे कृषी मंत्री आणि अधिकाऱ्यांची आभासी बैठक कृषी भवन, नवी दिल्ली येथे घेतली. यामध्ये पिकांचे अवशेष जाळण्याच्या घटनांवर चर्चा करण्यात आली.

Shivraj Singh Chauhan On Crop Residue Burning in Haryana
Shivraj Singh Chauhan: कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची शेतकऱ्यांसाठी नवी घोषणा

या बैठकीत शिवराज सिंह चौहान यांनी पिकांचे अवशेष शेतकऱ्यांनी जाळण्याऐवजी त्याच्या व्यवस्थापनासाठी चांगल्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले. त्यांनी शेतकऱ्यांना एक्स-सिटू, इन-सिटू आणि बायोडीकंपोजर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून पिकांचे अवशेष ही समस्या राहणार नसून ते उपयोगात आणले जातील. यामुळे पर्यावरणालादेखील फायदा होईल.

पिकांचे अवशेष न जाळता त्यांचा उपयोग केल्यास शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी, पंजाबमध्ये ३५ टक्के पिकांचे अवशेष जाळण्याच्या घटनेट घट झाली आहे. हरियाणात २१ टक्के घट झाली असून २०१७ च्या तुलनेत अशा घटनांमध्ये ५१ टक्के पेक्षा जास्त घट झाल्याचे त्यांनी नमुद केले आहे. असे असलेतरीही आपल्याला सतत लक्ष देण्याची गरज आहे. यावेळी उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीचे उपस्थित मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत आहोत. सरकार आपल्या बाजूने सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे राज्यांनी सांगितले आहे.

Shivraj Singh Chauhan On Crop Residue Burning in Haryana
Shivraj Singh Chauhan : शेतकऱ्यांचे छोटे-छोटे प्रश्न सोडवल्यास उत्पन्नात २० टक्के वाढ शक्य : कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

राकेश टिकैत यांची टीका

दरम्यान पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सध्या धान आणि गहू कापनीचे दिवस आहेत. येथे कापनीनंतर शिल्लक असलेल्या पिकांच्या अवशेषांना आग लावली जात आहे. यामुळे दिल्ली आणि दिल्लीच्या जवळील प्रदेशात हवेचे प्रदुषण वाढले आहे. त्यामुळे राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पिकांचे अवशेष जाळणाऱ्या शेतकऱ्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत आहे. यावरून पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर भारतीय किसान युनियन (बीकेयू) चे शेतकरी नेते आणि प्रवक्ते राकेश टिकैत यांनी टीका केली आहे.

सरकारच्या कारवाईवरून प्रश्न उपस्थित करताना टिकैत यांनी, सरकारने शेतकऱ्यांनाच आता पिकांच्या अवशेषाचे काय करावे ते सांगावे. सध्या शेतकरी पिकांचे अवशेष जाळत आहेत म्हणून सरकार कारवाई करत आहे. हरियाणात तर पिकांचे अवशेष जाळणाऱ्या शेतकऱ्यांचा माल घेऊ नये असा दंडक करण्यात आला आहे. त्यामुळे आता खरा मार्ग सरकारने सुचवावा, असे आवाहन टिकैत यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com