Yellow Alert Rain agrowon
ॲग्रो विशेष

Yellow Alert Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पुढचे ३ दिवस पावसाचा येलो अलर्ट, अतिवृष्टीचा इशारा

Thunderstorm Kolhapur : आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता जिल्ह्यातील काही भागात हवामान विभागाने वर्तवली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या ८ दिवसांत विविध ठिकाणी जोरदार वादळी पावसाने झोडपले. दरम्यान पुढचे काही दिवस पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता जिल्ह्यातील काही भागात हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, काल (दि.१२) रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १६.५ मि.मी. पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याला वळवाचा तडाखा बसत आहे. दरम्यान पुढचे ३ आणखी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.१६ तारखेनंतर वातावरणात थोडा बदल होण्याची शक्यता आहे. शनिवारी तसेच रविवारी जोरदार पाऊस झाला.

दरम्यान मागच्या २४ तासांत ढगाळ वातावरण राहिल्याने उष्णतेत वाढ झाली आहे. अनेक भागांत ढगाळ वातावरण असल्याने आजही पाऊस होईल, अशी शक्यता होती परंतु पावसाने हुलकावणी दिली. दुपारी काही काळ वातावरण निरभ्र झाले. उन्हाचा काहीसा तडाखाही बसला. उद्यापासून सकाळी हवेत उष्मा राहील, दुपारनंतर मात्र जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. आज (दि. १३) जिल्ह्याच्या काही भागांत अतिवृष्टी होईल, असाही अंदाज आहे.

दरम्यान, रविवारी सरासरी तापमानापेक्षा २.१ अंशांनी तापमानात घट झाली. गेल्या सात दिवसांपासून ३७ अंशांवर पारा होता. आत त्यात घट होऊन तो रविवारी तो ३३.७ अंशांपर्यंत खाली आला.

किमान तापमानही २३ अंश इतके नोंदवले गेले. यामुळे हवेत गारवा होता. दरम्यान, कोल्हापूर शहरात गेल्या २४ तासांत ५ मि.मी. पावसाची नोंद झाली.

गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक ३३.२ मि.मी. पाऊस झाला, आजरा च हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी २७.४ मि.मी., चंदगड तालुक्यात २१.२ मि.मी., शिरोळ तालुक्यात २२.२ मि.मी., कागलमध्ये २२ मि.मी.. राधानगरीमध्ये १६.५ मि.मी., भुदरगडमध्ये १२.१ मि.मी.. करवीरमध्ये ६.८ मि.मी., पन्हाळ्यात ३.४ मि.मी., शाहूवाडीत ३.२ मि.मी., तर गगनबावड्यात १.५ मि.मी. पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT