Kolhapur Rain Alert agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain Alert : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट

Kolhapur Flood : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिल्याने आज दिवसभर घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

sandeep Shirguppe

Kolhaur Rain : दोन दिवसांच्या पावसाने मागच्या २४ तासांत काहीसी उसंत घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला. परंतु हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिल्याने आज दिवसभर घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३५ फूट ७ इंचावर गेली आहे.

राधानगरी धरणाचे तीन दरवाजे सुरू असून, ५ हजार ७८४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ४२ बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे काही ठिकाणांची वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे. मात्र, वेधशाळेने पुढील २४ तासांत घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

पावसाने दोन दिवसांत चांगलीच तारांबळ उडवली. नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि पंचगंगा नदीने तिसऱ्यांदा पात्राची सीमा ओलांडली. त्यामुळे पुन्हा एकदा पूरस्थितीचे संकट दाट झाले. बहुतांशी धरणे पूर्णक्षमतेने भरली असून, त्यातूनही विसर्ग सुरू आहे.

मात्र, मागच्या २४ तासांत पावसाने काहीशी उघडीप दिल्याने पुराचे सावट काहीसे दूर झाले आहे. नदीची पाणी पातळी दुपारी ३४ फूट ५ इंच होती. पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. जिल्ह्यात २४ तासांत सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ७०.८ मिमी झाला आहे.

धरणातील पाणीसाठा (आकडे टक्क्यांमध्ये)

राधानगरी - ९८.४१, तुळशी - ९९.७१, वारणा - ९७.३०, दुधगंगा - ९४.४७, कासारी - ९९.३४, कडवी - १००, कुंभी - १००, पाटगाव - १००, चिकोत्रा - १००, चित्री - १००, जंगमहट्टी - १००, घटप्रभा - १००, जांबरे - १००, आंबेओहळ - १००, सर्फनाला - ७१.६

जिल्ह्यातील २४ तासांतील पाऊस (आकडे मिमीमध्ये)

गगनबावडा - ७०.८, हातकणंगले - १८, शिरोळ - ८.२, पन्हाळा - ४०.६, शाहुवाडी - ३९.४, राधानगरी - ३५.१, गगनबावडा - ७०.८, करवीर - २६.७, कागल - १९, गडहिंग्लज - २५.८, भुदरगड - ४२.३, आजरा - ६८.९, चंदगड - ४०.५, एकूण - ३१.६ मिमी पावसाची नोंद झाली.

पाण्याखालील बंधारे

शिंगणापूर, राजाराम, सूर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी, म्हसवे व शेणगाव, यवलूज, कांटे, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण व वालोली, हळदी, राशिवडे, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव, दत्तवाड, सुळकूड व सिध्दनेर्ली, बीड, खोची, कोडोली, शिगाव, चावरे, तांदुळवाडी, चिंचोली व माणगाव, निलजी व ऐनापूर, कूर्तनवाडी व चंदगड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT