Weather Update Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update In Jalna : जालना जिल्ह्यात ७ ते ९ एप्रिलदरम्यान येलो अलर्ट

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात ७ त ९ एप्रिल या कालावधीत येलो अलर्ट जारी केला आहे.

Team Agrowon

Jalna Weather News : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात ७ त ९ एप्रिल या कालावधीत येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.

या कालावधीत तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची व ताशी ३०-४० कि.मी. प्र.ता. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.

गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.

शेतकऱ्यांनी शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

नागरिकांनी वादळी वारे, वीजपासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.

आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथील दूरध्वनी क्र. ०२४८२-२२३१३२ या वर संपर्क साधावा, असे आवाहन प्र. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली कानडे-पवार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Sale Fraud: ‘पॉस’मधील गैरप्रकारांकडे सहा वर्षांपासून दुर्लक्ष

Illegal Raisin Import: बेकायदा बेदाणा आयातदारांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा

Sugar Industry: साखर निर्यात, इथेनॉलबाबत केंद्राने धोरण स्पष्ट करावे

Drip Irrigation Subsidy: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ठिबकसाठी अनुदान

Soybean Seeds Sale: सोयाबीन बियाण्याची ३२ हजार क्विंटलवर विक्री

SCROLL FOR NEXT