High Temperature Agrowon
ॲग्रो विशेष

High Temprature : यवतमाळ उच्चांकी ४६ अंशांवर

Weather Update : विदर्भात उष्ण लाटेचा इशारा; राजस्थानच्या फलोदी येथे ४९.८ अंश

Team Agrowon

Yavatmal Temprature : पुणे : भारतासह पाकिस्तानात सध्या सूर्याचा प्रकोप पाहायला मिळत आहे. पाकिस्तानातील जेकोबाबाद येथे पारा तब्बल ५२ अंशांवर पोचला आहे. तर राजस्थानच्या फलोदी येथे ४९.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. यवतमाळ येथे महाराष्ट्राचे हंगामातील उच्चांकी ४६ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. २८) विदर्भातील अकोला, चंद्रपूर, यवतमाळमध्ये उष्ण लाटेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

उन्हाचा चटका कायम असल्याने सोमवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये यवतमाळ, अकोला व ब्रह्मपुरी येथे तापमान ४५ अंशांच्या पार असल्याने उष्णतेची लाट अनुभवायला मिळाली. तर गोंदिया, अमरावती, वर्धा आणि परभणी येथे पारा ४४ अंशांपार असल्याने उन्हाची ताप असह्य झाली. तर सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर, लातूर, धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वीज पडून जीवित हानी झाली.
आज (ता. २८) विदर्भातील अकोला, चंद्रपूर, यवतमाळमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कमी अधिक होण्याची, तसेच तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३५.७, धुळे ४२.०, जळगाव ४०.७, कोल्हापूर ३२.८, मालेगाव ४०.४, महाबळेश्वर २५.२, नाशिक ३५.८, निफाड ४०.४, सांगली ३३.९, सातारा ३३.९, सोलापूर ४०.४, सांताक्रूझ ३४.४, डहाणू ३५.९, रत्नागिरी ३३.०, छत्रपती संभाजीनगर ४१.८, नांदेड ४३.६, परभणी ४४.०, अकोला ४५.२, अमरावती ४४.२, भंडारा ४३.३, बुलडाणा ४३.३, ब्रह्मपुरी ४५.०, चंद्रपूर ४३.२, गडचिरोली ४३.४, गोंदिया ४४.४, नागपूर ४२.४, वर्धा ४४.१, वाशीम ४३.४, यवतमाळ ४६.०.


‘रेमल’ चक्रीवादळ ओसरले
बंगालच्या उपसागरातील ‘रेमल’ तीव्र चक्रीवादळ रविवारी (ता. २६) मध्य रात्री जमिनीवर आले. ही प्रणाली आता ओसरण्यास सुरुवात झाली आहे. बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये असलेले चक्रीवादळ आता नैॡत्येकडे सरकू लागली आहे. आज (ता. २८) ईशान्य भारतात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय राहण्याची शक्यता आहे. यामुळे पूर्वोत्तर राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

४४ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :
यवतमाळ ४६, अकोला ४५.२, ब्रह्मपुरी ४५, गोंदिया ४४.४, अमरावती ४४.२, वर्धा ४४.१, परभणी ४४.

उष्ण लाटेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
अकोला, चंद्रपूर, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Business Marketing: ब्रॅंडिंग, पॅकेजिंगवर भर देणे गरजेचे

India Cotton Price: युध्दामुळे पांढऱ्या सोन्याला झळाळी

Maharashtra Rain: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Payment Crisis: ऊसबिले थकबाकीत तब्बल ३२ पट वाढ

Farmers Protest: कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडल्याने शेतकरी संतप्त, 'महावितरण'च्या अधिकाऱ्यांना विचारला जाब

SCROLL FOR NEXT