Organic Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : बुलडाण्यात जिल्हास्तरीय कार्यशाळेत सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शन

Natural Agriculture Mission : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत येथे जिल्हास्तरीय नैसर्गिक शेती कार्यशाळा झाली. या वेळी शास्त्रज्ञांनी सेंद्रिय शेतीबाबत तांत्रिक प्रशिक्षण दिले.

Team Agrowon

Buldana News : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत येथे जिल्हास्तरीय नैसर्गिक शेती कार्यशाळा झाली. या वेळी शास्त्रज्ञांनी सेंद्रिय शेतीबाबत तांत्रिक प्रशिक्षण दिले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे हे ऑनलाइन पद्धतीने, तर डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे संचालक संतोष आळसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, विकास समितीचे कुवरसिंह मोहने, प्रकल्प संचालक आत्माचे पुरुषोत्तम उन्हाळे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अनिल तारू, केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ विकास जाधव, जय किसान शेतकरी गटाचे संशोधन संचालक संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.

संचालक श्री. आळसे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेची अंमलबजावणी कशा स्वरूपात केली जाईल, याची बाबनिहाय माहिती दिली. तसेच जिल्हास्तरीय समितीचे कार्यगट व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून करावयाची कामे, नैसर्गिक शेतीचे प्रामाणिकरण, व्यवसाय कृती आराखडा तयार करणे, आयसीएस प्रामाणिकरण, शेतकरी प्रशिक्षण गावाची निवड करणे, गटाची निवड करणे आदी रूपरेषेबाबत सविस्तर सादरीकरण केले. नैसर्गिक मिशन राबवत असताना क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन केले.

सर्ग विकास समितीचे कुवरसिंह मोहने यांनी गेल्या २० वर्षांपासून सेंद्रिय व नैसर्गिक शेती करत असताना त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून येणारी आवाहन व घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. हरितक्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजे कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न केलेले वाण वापरले जातात.

त्यामुळे जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढवून पिकांची वाढ योग्य प्रमाणात होते. त्यामुळे उच्च प्रतिच्या आरोग्यास पोषक उत्पादनाची निर्मिती व्हायची. उत्पादनाचे प्रमाण वाढवत असताना रासायनिक खताचा अतिरिक्त वापर करून जमीन नाशवंत करण्याच्या मार्गाने जात आहोत असे सांगितले. विकास जाधव यांनी कृषी विद्यापीठ व केव्हीके यांच्यामार्फत नैसर्गिक शेतीतील सहभागाविषयावर मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT