MGNREGA Agrowon
ॲग्रो विशेष

MGNREGA Wages : ‘रोहयो’च्या मजुरीसाठी आमदार- खासदार सरसावले

Rural Employment : मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यांतील हजारो मजुरांचे रोजगार हमी योजनेच्या (रोहयो)कामाचे जवळपास ६५ कोटी रुपयांची मजुरी अनेक महिन्यापासून थकीत आहे.

Team Agrowon

Amaravati News : मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यांतील हजारो मजुरांचे रोजगार हमी योजनेच्या (रोहयो)कामाचे जवळपास ६५ कोटी रुपयांची मजुरी अनेक महिन्यापासून थकीत आहे.

त्यामुळे अनेक कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे ही मजुरी मिळावी यासाठी आमदार केवळराम काळे व खासदार बळवंत वानखडे सरसावले असून त्यांनी सरकारकडे निधी देण्याची मागणी केली आहे.

खासदार बळवंत वानखडे यांनी रोजगार हमी योजनेच्या प्रधान सचिवांची भेट घेऊन मजुरांचे पैसे त्वरित मजुरांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली. तर मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी सुद्धा हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न लावून धरला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनाही या समस्येबाबत अवगत केले.

होळीपूर्वी मजुरांचे पैसे देण्यास आमदारांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक राहुल सोनोने यांनी दिली. शासन निर्णयाप्रमाणे रोहयोची मजुरी मजुरांना पंधरा दिवसाच्या आत मिळणे अपेक्षित असते.

परंतु शासन निर्णयाला ना जुमानता गरीब मजुरांची मजुरी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे, त्यामुळे मजुरांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. मजुरी न मिळाल्याने मेळघाट ची अर्थव्यवस्था ढसाळली असून बाजारपेठेतही मरगळ आली आहे.

मेळघाटातील रोहयोच्या मजुरांची मजुरी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती, मजुरांचे मेहनतीचे पैसे त्यांना वेळेवर मिळाले पाहिजे त्याकरिता मंत्रालयात रोहयोच्या सचिवांची भेट घेतली. त्यांना या समस्येबाबत कळविले. पैसे देण्यास उशीर झाल्याचे त्यांनी मान्य केले. दोन दिवसांत मजुरांना पैसे मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
- बळवंत वानखडे, खासदार, अमरावती
माझ्या मतदार संघातील हजारो मजुरांची मजुरी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. ती मिळावी यासाठी प्रयत्नरत होतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न लावून धरला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी भेट घेऊन त्यांना या समस्येबाबत कळविले आहे. एक-दोन दिवसांत मजुरांना मजुरी मिळेल.
- केवलराम काळे, आमदार, मेळघाट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT