Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC: पुणे बाजार समितीच्या नवीन फुलबाजाराचे काम संथ गतीने

Flower Market Construction Delay: गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फूल बाजाराच्या नवीन इमारतीच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात आला आहे.

गणेश कोरे

Pune News: गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फूल बाजाराच्या नवीन इमारतीच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात आला आहे.

या इमारतीत अतिरिक्त दोन मजले, वाहनतळासाठी एक अतिरिक्त तळमजला वाढविण्यात आल्याने अद्याप बांधकाम सुरू असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी (ता. ३) दिली. नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाला विलंब झाल्याची अप्रत्यक्ष कबुलीही श्री. रावल यांनी विधानसभेत दिली.

बाजार समितीने २०१६ मध्ये ५४ कोटी रुपये खर्च करून फूल बाजार इमारत उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र या इमारतीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या संदर्भात आमदार बापू पठारे यांनी हा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. त्या संदर्भात बोलताना रावल यांनी माहिती दिली.

सूचना करूनही काम अपूर्ण

‘इमारतीच्या बांधकामाची पाहणी जानेवारी महिन्यात करण्यात आली होती. त्या वेळी उर्वरित काम शंभर दिवसांत पूर्ण करण्याची सूचना केली होती.

मात्र इमारत उभारणीचे काम सुरू असल्याने कोणावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही,’ असे मंत्री रावल यांनी सांगितले. या प्रकल्पाचे काम कधी पूर्ण होणार, असा सवाल बाजार घटकांतून विचारला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT