Women Empowerment Agrowon
ॲग्रो विशेष

Women Empowerment : महिलांच्या मेहनतीला डिजिटल बळ ; ऑनलाइन विक्रीतून यशस्वी पाऊल

Online Product Sale : दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई माध्यमातून ‘जागर स्त्री शक्तीचा: महिला संमेलन’ नुकतेच झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून आमदार मुंदडा बोलत होत्या.

Team Agrowon

Beed News : महिलांची काम करण्याची पद्धती वेगळी असते. महिला हाती घेतलेले काम यशस्वी करतात. दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या प्रक्रिया उत्पादनांची ऑनलाइन विक्री करण्याचा प्रयोग अत्यंत अभिनव, असल्याचे मत आमदार नमिता मुंदडा यांनी व्यक्त केले.

दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई माध्यमातून ‘जागर स्त्री शक्तीचा: महिला संमेलन’ नुकतेच झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून आमदार मुंदडा बोलत होत्या.अध्यक्षस्थानी दीनदयाल शोध संस्थान बीड प्रकल्प संचालक डॉ. उपेंद्र कुलकर्णी, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास बडे, अंबाजोगाई नायब तहसीलदार स्मिता बाहेती,संध्या कुलकर्णी, एसबीआय बँक अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, केज बालविकास प्रकल्प अधिकारी शोभा लटपटे व केव्हीके वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांची मंचावर उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी भरड यांनी केले. आमदार मुंदडा म्हणाल्या, की समाजामधील विचार करण्याची पद्धती बदलत आहे. समाज स्वतःच्या आरोग्य प्रति जागरूक होत आहे. प्रक्रिया उत्पादने तयार करणाऱ्या महिलांना आवश्यक मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. श्री.बडे म्हणाले, की महिलांना प्रत्येक घटकाच्या निवडीचा पर्याय उपलब्ध असतो तेव्हा महिला सक्षम झाली असे म्हणता येईल.

महिलांनी अत्यंत दर्जेदार प्रक्रिया उत्पादने तयार केली आहेत. संध्या कुलकर्णी म्हणाल्या, की शहरांमध्ये लहान मुलांसाठी विविध मिलेट उत्पादने तयार करून त्याची विक्री होत आहे. ऑनलाइन माध्यमातून महिलांचे विविध उत्पादने देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये विक्री होत आहेत.

श्री.सूर्यवंशी म्हणाले, की महिलांनी दर्जेदार प्रक्रिया उत्पादने तयार केली आहेत. कृषी विज्ञान केंद्राने महिला उत्पादकांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षित केले आहे. महिला उद्योजकांसाठी बँकेच्या विविध योजना उपलब्ध आहेत. बँकेच्या कर्ज योजनांचा लाभ घ्यावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गृहविज्ञान शास्त्रज्ञ रोहिणी भरड यांनी केले तर आभार डॉ. वसंत देशमुख यांनी व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Marriage Problems: ग्रामीण भागातील लैंगिक कोंडमारा

Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्याला पहिले प्राधान्य

Agriculture Loan Waiver: शेतकऱ्यांची राजकीय ताकद उभी राहील का?

Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?

Weekly Weather: हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT