Women Empowerment : राज्यात ४२५ महिला शेतकरी उत्पादक कंपन्या !

Agricultural Innovation : देशभरात ४२ हजारांहून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या नोंदणीकृत आहेत. त्यातील २५ टक्के कंपन्या बंद आहेत. पुरुषांपेक्षा शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून महिलांची वाटचाल अधिक जोमाने सुरू आहे.
Women Empowerment
Women EmpowermentAgrowon
Published on
Updated on

Women Farmers Success Story : ग्रामीण भागात शेतीत राबताना दोन पैसे वाचविण्यासाठी झालेली महिला बचत गटाची चळवळ व्यापक झाली. त्यातून घरगुती उद्योग स्थापन झाले, आता ग्रामीण भागात संघटितपणे कामकाज करण्यासाठी प्रयोगशील महिलांनी पुढे येत शेतकरी उत्पादक कंपन्यांची चळवळ स्वीकारून बदलांची वाट धरली आहे. शेतीसारख्या आव्हानात्मक क्षेत्रातही महिला शेतकरी पुढे येऊन समर्थपणे नेतृत्व शकतात, अशी अनेक आदर्श उदाहरणे पुढे येत आहेत.

आखातात डंका...

शेती क्षेत्रात महिलांचे लक्षणीय योगदानामुळे सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीनेही (नाशिक) सर्वच पातळ्यांवर त्यांच्या सहभागावर भर दिला. यात शेळीपालन मूल्यसाखळी विकसित करण्याचे आदर्श कामकाज सावित्रीबाई फुले शेळी पालक उत्पादक उत्पादक कंपनी (सिन्नर, जि. नाशिक) केले. तर, मसाले उत्पादनात श्री शिवाई मसाले शेतकरी कंपनी (पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक),

Women Empowerment
Women Empowerment : सनद - महिलांचे जीवनमान सुधारण्याची

हातसडी तांदूळ तसेच घाणीच्या तेल उत्पादन घेणारी वुमेन्स पॉवर शेतकरी कंपनी (घोटी, जि. नाशिक) पुढे येऊन नवा आयाम तयार करीत आहे. जीवनसंगिनी कृषी विकास महिला शेतकरी कंपनी (तळणी, ता. मोताळा, जि. बुलडाणा), माणदेशी शेतकरी कंपनी (म्हसवड, जि. सातारा), यशस्विनी अ‍ॅग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी (बोरामणी, जि. सोलापूर), निर्मलमाई शेतकरी कंपनी (कळमना, जि. नागपूर).

‘स्मार्ट’प्रकल्पाचे पाठबळ

महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या माध्यमातून महिलांना संघटित केले. आता महिला शेतकरी कंपन्यांची स्थापना करत सक्षमतेकडे महिलांचे पाऊल पडते आहे. शासनाने जागतिक बँकेच्या साह्याने आणलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत महिलांच्या ४०० कंपन्या स्थापन झाल्या आहेत. २.५ लाख महिला वाटचाल करत आहेत.

Women Empowerment
Women Empowerment : बचत गटाच्या साथीने महिला झाल्या सक्षम

कृषी प्रक्रिया, शेतमाल मूल्यवर्धन, विपणन, शेतीमाल खरेदी ते विक्री या माध्यमातून उद्योजकता क्षेत्रात सहभाग वाढत आहे. त्यामध्ये महिला उत्पादक कंपनीत संपूर्ण महिला तर संमिश्र शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये ३० टक्के महिला भागधारक व २० टक्के महिला संचालक आहेत. यात ८३ टक्के अल्पभूधारक महिलांचा समावेश असून २.१० लाख महिला समभागधारक आहेत. राज्यभरात १५० प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.

या क्षेत्रात महिला उत्पादक कंपन्यांचे होतेय कामकाज

डाळ मिल, राइस व फ्लोअर मिल

भाजीपाला संकलन केंद्र

पशुखाद्य निर्मिती

जनावर एकत्रीकरण व संगोपन केंद्र

मसाले उत्पादने

काजू प्रक्रिया

नाचणी प्रक्रिया

शेळीपालन, दुग्ध व्यवसाय व प्रक्रिया

महिलांच्या जीवनात नव्या संधी निर्माण झाल्या, शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाल्यानेच प्रत्येकीचे वार्षिक उत्पन्नही वाढले आहे.
मनीषा पोटे, व्यवस्थापकीय संचालक, सावित्रीबाई फुले शेली उत्पादक कंपनी ९४२३९७०६५५
शासनाच्या मदतीने तेलघाणीवर तेल उत्पादन सुरू आहे. यातून महिलांना रोजगार मिळाला आहे.
मथुरा जाधव, अध्यक्ष, वूमेन्स पॉवर शेतकरी उत्पादक कंपनी, घोटी, जि. नाशिक ९१४५७०९७१९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com