Balasaheb Thorat Agrowon
ॲग्रो विशेष

Women Empowerment: महिला केवळ कुटुंबाचा आधार नसून समाजाची खरी ताकद : थोरात

Balasaheb Thorat: क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्याचाच परिणाम महिला आता प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहेत.

Team Agrowon

Ahilyanagar News: क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्याचाच परिणाम महिला आता प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहेत.

शिक्षण, विज्ञान, राजकारण क्रीडा, उद्योग-व्यवसाय, उद्योजकता अशा सर्वत्रच महिला आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. आपण महिलांचा आदर केला पाहिजे महिला केवळ कुटुंबाचा आधार नसून समाजाची खरी ताकद असल्याचे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

सह्याद्री महाविद्यालयात युनियन बँक ऑफ इंडिया, जयहिंद महिला मंच, संग्राम पतसंस्था आणि सह्याद्री महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर विशेष व्याख्यान व ‘लोकशास्र सावित्री’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, युनियन बँकेचे अधिकारी मनीष कुमार, कांचनताई थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, शर्मिला देशमुख, शरयुताई देशमुख, डॉ. सोमनाथ मुटकुळे, नामदेव गुजाळ, हिरालाल पगडाल, राणीप्रसाद मुंदडा, मंजुळ भारद्वाज, प्रमिला अभंग आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी युनियन बँकेचे अधिकारी मनीष कुमार, शर्मिला देशमुख यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: पावसाचा जोर ३ दिवस कमीच राहणार; विदर्भात गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Heavy Rain : जालना शहरासह जिल्ह्याभरात थैमान

Kolhapur Shahi Dasara: कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव, जाणून घ्या त्याचे महत्त्व

Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वी; ई-केवायसी अट शिथिल, मंत्रिमंडळाचा निर्णय

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या विसर्गात घट वाढ सुरूच

SCROLL FOR NEXT