Yarn Mill Election Agrowon
ॲग्रो विशेष

Yarn Mill Election : सूतगिरणी निवडणुकीतून दिग्गजांची माघार

बिनविरोध होणार की निवडणूक लागणार, याबाबत उत्सुकता, माजी अध्यक्ष लिगाडे यांचाही समावेश;

टीम ॲग्रोवन

सांगोला, जि. सोलापूर : सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या (Sangola Farmers Cooperative Yarn Mill) संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. परंतु सूतगिरणीचे माजी अध्यक्ष नानासाहेब लिगाडे (Nanasabh Ligade) यांच्यासह अन्य काही मोठ्या नेत्यांनी निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर सूतगिरणीची पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. आतापर्यंत सर्व निवडणुका देशमुख यांनी बिनविरोध केल्या आहेत. त्यांच्यानंतर आता त्यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख आणि नातू डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख हे त्यांचा वारसा पुढे सांभाळत आहेत.

स्वर्गीय देशमुख यांच्या आग्रहाखातर आपल्या शिक्षकी पेशाचा राजीनामा देऊन सूतगिरणीचे अध्यक्ष झालेले नानासाहेब यांनी या निवडणुकीतून आता आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे.

विशेष म्हणजे उमेदवारी मागे घेण्यास आणखी दोन दिवस शिल्लक असताना ऐनवेळी त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. सूत गिरणीच्या १७ जागांसाठी ५६ अर्ज वैध ठरले आहेत. येत्या २७ ऑक्टोबरला उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. पण त्या आधीच लिगाडे यांची ही माघार चर्चेचा विषय ठरली आहे. या निवडणुकीसाठी ११ हजार ४६० सभासद (मतदार) आहेत. तर संस्था प्रतिनिधी मतदारसंख्या ८१ आहे. सध्या या निवडणुकीने तालुक्याचे लक्ष वेधले आहे.

ज्येष्ठांच्या माघारीने चर्चा वाढली

सूत गिरणीचे सलग पंधरा वर्षे अध्यक्ष राहिलेले नानासाहेब लिगाडे यांच्यासह या निवडणुकीतून आता माजी संचालक बाबूराव गायकवाड, शहाजीराव नलवडे, गोविंद जाधव, शिवाजी मिसाळ, विशालदीप बाबर, अंकुश येडगे यांसारख्या दिग्गज आणि ज्येष्ठ नेत्यांनीही निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबतची चर्चा अधिकच सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Free Utensils Scheme: बांधकाम कामगारांसाठी खास कल्याणकारी योजना; मिळणार मोफत गृहउपयोगी वस्तू

Plastic Flower Ban : कृत्रिम फुलांवर बंदीबाबत निर्णयाची अंमलबजावणी कधी?

Flood Crop Damage : पिकांसोबत मातीही गेली वाहून

Nimboli Ark: निंबोळी अर्क घरच्या घरी कसा तयार करायचा? निंबोळी अर्काचे फायदे काय ?

Agrowon Podcast: हळदीच्या दरावरील दबाव कायम, गवारला उठाव कायम, शेवगा महागले; काकडी आवक वाढली, लसूणचे भाव स्थिर

SCROLL FOR NEXT