SYSTEM
ॲग्रो विशेष

Onion Market : विंचूर उपबाजाराची कांदा लिलावात आघाडी

Vinchur APMC : विंचूर, जि. नाशिक येथील उपबाजार समितीने मुख्य कांदा आवारापेक्षाही एक लाख १४ हजार क्विंटलने अधिक कांद्याचे लिलाव केले आहेत.

Team Agrowon

Nashik News : लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार समितीने चार महिन्यांत कांदा लिलावात आघाडी घेतली आहे. मुख्य कांदा आवारापेक्षाही एक लाख १४ हजार क्विंटलने अधिक कांद्याचे लिलाव केले आहेत. विंचूर उपबाजार समितीने लासलगावच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार आवाराला पिछाडीवर टाकत कांदा लिलावात ऐतिहासिक नोंद केली.

आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीचे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र आवारातील कांद्याचे लिलाव ऑगस्टपासून वेगवेगळ्या कारणांमुळे सतत बंद ठेवले जात आहेत. यामुळे कांद्याच्या लिलावावर परिणाम झाला.

समितीमध्ये ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि १९ नोव्हेंबरपर्यंत एकूण ११२ दिवसांत दीपावलीत साप्ताहिक सुट्ट्या आणि कांदा व्यापाऱ्यांच्या मनमानी निर्णयामुळे ४७ दिवस कांद्याचे लिलाव बंद होते. येथे ६ लाख ९७ हजार क्विंटलची कांद्याची आवक झाली, तर विंचूर येथे याच दिवसांत कांदा व्यापारी, कामगारांनी कांदा लिलावात सातत्य ठेवले आणि ८ लाख ११ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. येणाऱ्या दिवसात अधिक कांद्याचे लिलाव करत ही आघाडी कायम ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लासलगाव बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ थोरे यांनी सांगितले.

१ ऑगस्ट ते १९ नोव्हेंबरपर्यंत एकूण ११२ दिवसांत लासलगावच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार साप्ताहिक सुट्ट्या, दीपावली आणि व्यापाऱ्यांनी वेगवेगळ्या कारणासाठी बंद ठेवला. एकूण ४७ दिवस कांदा लिलाव बंद राहिले. विंचूर उपबाजारात २८ दिवस कांदा लिलाव बंद होते.

नव्या साखर कमी येण्याची शक्यता

यंदाच्या नव्या साखरेची आवक देशांतर्गत बाजारात अतिशय कमी प्रमाणात पहिल्या टप्प्यात तरी होईल, अशी शक्यता आहे. यंदाच्या गळीत हंगामाच्या सुरवातीच्या उत्पादनाचे आकडे गृहीत धरून केंद्राने तातडीने दिवाळी झाल्या झाल्या नोव्हेंबरच्या विक्रीसाठी दुसरा टप्प्यातील कोटा जाहीर केला.

आवकेची तुलनात्मक स्थिती (क्विंटल)

महिना....लासलगाव...विंचूर उपबाजार

ऑगस्ट...३ लाख ११ हजार...३ लाख २२ हजार

सप्टेंबर...१ लाख १४ हजार...१ लाख ६५ हजार

ऑक्टोबर...२ लाख ४० हजार...२ लाख ४९ हजार

नोव्हेंबर(७ /१३ नोव्हेंबर)...३२ हजार...७५ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT