Ajit Pawar and Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र येणार?

Politics Update: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली असतानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना बळकटी मिळत आहे.

Team Agrowon

Mumbai News : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली असतानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना बळकटी मिळत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत एकत्रीकरणाबाबत गुगली टाकल्याने चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे.

राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या एकत्रीकरणाच्या मुद्यावर श्री. पवार यांनी भाष्य केलेले असले तरी आपण संसदेत विरोधी बाकांवर राहूनच काम करणार आहोत; आम्हाला भाजपला विश्वासार्ह पर्याय तयार करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘‘आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत. त्यापैकी एका गटाला अजित पवार यांच्यासोबत जावे असे वाटत आहे. तर एका गटाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या भाजपसोबत जाता कामा नये, असे वाटते. इंडिया आघाडीची नव्याने जुळणी करावी, असे त्यांचे मत आहे. इंडिया आघाडी सध्या सक्रिय नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या पक्षाची नव्याने उभारणी करावी लागेल, तरूणांना पक्षात आणावे लागेल व काम सुरू करावे लागेल,’’ असे श्री. पवार म्हणाले.

खा. सुप्रिया सुळे यांचे काय, या प्रश्नावर श्री पवार म्हणाले, ‘‘सुप्रियाला भूमिका घ्यावी लागेल. संसदेत विरोधी बाकांवर बसायचे, असा निर्णय तिने घेतलेला आहे.’’ शरद पवार आणि अजित पवार हे खासगी कार्यक्रमांमध्ये एकत्र आले. तसेच काही संस्थांच्या बैठकांच्या वेळी त्यांच्या भेटी झाल्या. मात्र, त्यातून एकत्र येण्याचे संकेत मिळालेले नव्हते. अखेर श्री. पवार यांनीच त्याबाबत भाष्य केल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

विरोधी बाकांवर राहूनच काम करणार

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल श्री. पवार म्हणाले, ‘‘ते खूप कष्ट घेतात. झपाट्याने काम करतात. जेव्हा देशात एखादा मुद्दा पुढे येतो, तेव्हा ते त्यावर व्यक्त होतात. परंतु त्यांनी जमिनीवर आणखी आक्रमकपणे काम करण्याची आवश्यकता आहे, एवढेच मी सांगेन. केवळ राहुलच नव्हे तर संपूर्ण विरोधी पक्षाने असे काम करण्याची आवश्यकता आहे. ‘‘इंडिया आघाडीसाठी सध्या वातावरण अनुकूल नाही, परंतु ते बदलू शकते. विरोधी बाकांवर राहून काम करायचे हाच आमचा विचार आहे. आम्हाला भाजपला विश्वासार्ह पर्याय तयार करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT