Marketing Minister Jayakumar Rawa Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC Investigation: बाजार समितीतील चुकीच्या कामांची चौकशी करणार : जयकुमार रावल

Marketing Minister Jayakumar Rawal: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनियमित व चुकीच्या कामांवर तपास सुरू करण्याची घोषणा पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक कामे ही चुकीच्या पद्धतीने आणि अनियमितपणे झाल्याच्या प्रकार गंभीर आहे. या बाबतच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. या सर्व कामांची चौकशी लावणार असल्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ येथे पणनमंत्री जयकुमार रावल विविध बैठकांसाठी आले होते. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना त्यांनी उत्तरे दिली. पेरणे (ता. हवेली) येथील जागा ताब्यात नसताना ५३ लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आल्याच्या धक्कादायक प्रकाराबाबतही रावल यांनी भाष्य केले.

या बाबतची तत्काळ चौकशी लावण्यात येईल तसेच गेल्या २० वर्षांपासून बाजार समितीच्या अनेक चौकशा प्रलंबित आहेत. तसेच विद्यमान संचालक अस्तित्वात आल्यापासून देखील अनेक चुकीच्या आणि बेकायदेशीर कामांबाबत चौकशा देखील सुरू आहेत. या बाबत काही संचालक उघडपणे बोलत आहेत, की सचिव आमचेच आहेत त्यांच्या संमतीनेच आम्ही कामे करत आहोत.

त्यामुळेच ते चुकीच्या कामांना पाठिंबा देतात कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत. तसेच, पणन संचालकांना देखील आम्ही मॅनेज केले आहे आणि आम्ही पणनमंत्र्यांना देखील मॅनेज करू असे काही संचालक बोलत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर रावल यांना विचारले असता ते म्हणाले, की अशी वक्तवे करण्याचा प्रकार गंभीर आहे. बाजार समितीच्या संबंधित ज्या सर्व चौकशी आहेत त्या तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देणार आहे. तसेच चुकीच्या कामांना कोणत्याही प्रकारे पाठिंबा दिला जाणार नाही. चुकीच्या कामांवर कारवाई केली जाईल.

चुकीच्या कामांचे पेव?

पुणे बाजार समिती ही राष्ट्रीय बाजार होण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. त्यामुळे संचालक मंडळ आणि पदाधिकारी धास्तावले आहेत. त्यामुळे अनधिकृत आणि चुकीची कामे करण्यावर भर दिला जात आहे. कोणत्याही प्रकारची कामे आणा आणि पैसे कमवा, असे उद्योग बाजार समितीमध्ये खुलेआम सुरू आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver GR: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा शासन निर्णय जारी; शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

Farm Loan Waiver GR: कर्ज २ लाखांपेक्षा जास्त असेल तर माफ होणार का?; 'एकवेळ समझोता' योजना काय आहे?

Ujani Dam Water: पाऊस लांबण्याची शक्यता; उजनीतील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव

Banana Cultivation: केळीच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे गरजेचे : शरद विसपुते

Kharif Tayari: दिंडोरी तालुक्यात कृषी विभागाकडून खरिपाची तयारी

SCROLL FOR NEXT