Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Produce : शेतीमाल विक्रीस मॉलमध्ये जागा देणार : पालकमंत्री देसाई

Shamburaj Desai : ‘‘शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारपेठ मिळत नाही. शेतकऱ्यांची ती गैरसोय दूर करण्यासाठी त्यांच्या मालाला नवी मुंबई, ठाणे, वाशी येथील मोठ्या मॉलमध्ये जागा देण्यासाठी मी प्रयत्न करेन,’’ अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.

Team Agrowon

Satara News : ‘‘शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारपेठ मिळत नाही. शेतकऱ्यांची ती गैरसोय दूर करण्यासाठी त्यांच्या मालाला नवी मुंबई, ठाणे, वाशी येथील मोठ्या मॉलमध्ये जागा देण्यासाठी मी प्रयत्न करेन,’’ अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.

‘‘सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना सवलतीच्या दरात स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

कऱ्हाड बाजार समितीने जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक, कृषीसह शासनाच्या विविध विभागांच्या सहकार्याने येथे आयोजित १८ व्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. उदयसिंह पाटील, बाजार समितीचे सभापती विजय कदम उपस्थित होते.

खासदार पाटील म्हणाले, ‘‘आज शेतात माल पिकत आहे, पण विकायला जागा नाही. ग्रामीण भागात उत्पादन होते, ते गुणवत्तेच्या जोरावर शहरी बाजारपेठेत चांगल्या दराने विकले गेले पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी नव्हे, कर्जवसुली मोहीम; सरकारच्या शेतकरी धोरणांवर आमदार दानवेंचा जोरदार हल्लाबोल

Maharashtra Monsoon Session 2026: 'शेतकरी हवालदिल, पाणी नाही, रात्री २ वाजेपर्यंत झोप लागत नाही', शेतकरी प्रश्नांवरुन विधानसभेत गदारोळ

Girna Dam Water Release: गिरणा धरणातून टंचाई निवारणासाठी पाचवे आवर्तन

Natural Farming Workshop: केव्हीकेत नैसर्गिक शेतीवरील वैज्ञानिक कार्यशाळेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Banana Farmers Support: केळी उत्पादकांना विमा योजनेचाच आधार

SCROLL FOR NEXT