Cow Milk Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Doodh Sangh : दूध, पशूखाद्य, भुकटीनिर्मितीसाठी 'अमूल'शी करार करणार

Animal Feed : खासगी दूध खरेदीदारांकडून दुधास मिळणाऱ्या दाराचा विचार करुन अमूल डेअरीशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Solapur News : खासगी दूध खरेदीदारांकडून दुधास मिळणाऱ्या दाराचा विचार करुन अमूल डेअरीशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना चांगला दर देता येईल. जिल्हा दूध संघाच्या पशुखाद्यासाठी अमूल कंपनीसोबत करार झाल्याने पशुखाद्य विक्रीतही वाढ होईल.

दूध संघाच्या भविष्याचा विचार करता दूध संघाला स्वत:च्या पावडर प्लँटची गरज असून त्यासाठी संचालक मंडळाकडून प्रयत्न करत असल्याची माहिती सोलापू्र जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी दिली.

संघाची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लोकनेते बाबूराव (अण्णा) पाटील सभागृहात अध्यक्ष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते यावेळी दूध संघाची उपाध्यक्ष दीपक माळी, तज्ज्ञ संचालक सुरेश हसापूरे, मारुती लवटे, योगेश सोपल, विजय येलपले, औदुंबर वाडदेकर, बाळासाहेब माळी, संभाजी मोरे, राजेंद्रसिंह पाटील, मनोज गरड, राजेंद्र मोरे, मारुती ढाळे, अलका चौगुले, वैशाली शेंबडे, सज्जन ढेकणे आदी उपस्थित होते.

अध्यक्ष शिंदे म्हणाले, राष्ट्रीय दुग्धशाळा विकास कार्यक्रमातून केगाव येथील दूध प्रकल्पाचे सक्षमीकरण झाले आहे. एकात्मिक कोल्ड चेन या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत आइस्क्रीम प्लँटसाठी व महानंदामार्फत बल्क कुलर योजनेसाठी संघाने सादर केलेला प्रस्ताव शासनाकडे अंतिम टप्प्यात आहे.

जिल्हा दूध संघाबद्दल शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण होत असून जिल्हा दूध संघाचे दैनंदिन संकलन आता २५ हजारावरून ८० हजार लिटरपर्यंत गेले आहे. माढ्याचे सभासद दिलीप भोसले यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

दीपक अवताडे व भाऊसाहेब धावणे यांनी प्रश्न उपस्थित केले. माजी संचालक शिवाजी पाटील संचालक मंडळाचे अभिनंदन करत जिल्ह्यातील पशुधनाच्या पिण्याच्या व चाऱ्याचा प्रश्‍नासाठी उजनीतून पाणी सोडण्याची मागणी केली. या मागणीचा ठराव करून शासनाकडे पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizers Crisis: खतबाजारात खदखद

Strait of Hormuz Crisis: ‘होर्मूझ’मधील पाणसुरुंग हटविण्यास सहा महिने लागण्याची शक्यता

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार ‘जैसे थे’

Maharashtra Weather Forecast: उन्हाचा चटका वाढणार; पावसाचीही शक्यता

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

SCROLL FOR NEXT