Jalgaon Dairy : दूध संघाचा तोटा आठ कोटींवरून दोन कोटींवर

Jalgaon Zilla Sahakari Dudh Utpadak Sangh : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचा तोटा मागील काही महिन्यांत सतत कमी झाला आहे. पूर्वी हा तोटा आठ कोटी रुपये होता. तो दोन कोटी रुपयांवर आणण्यात संचालक मंडळाला यश आल्याची माहिती संघाच्या सर्वसाधारण सभेत देण्यात आली.
Jalgaon Dairy
Jalgaon Dairy Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जिल्हा सहकारी दूध संघाचा तोटा मागील काही महिन्यांत सतत कमी झाला आहे. पूर्वी हा तोटा आठ कोटी रुपये होता. तो दोन कोटी रुपयांवर आणण्यात संचालक मंडळाला यश आल्याची माहिती संघाच्या सर्वसाधारण सभेत देण्यात आली.

Jalgaon Dairy
Jalgaon Dairy : जिल्हा दूधसंघातील वादग्रस्त नोकरभरती रद्द

दूध संघाची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यात संचालक तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण, चिमणराव पाटील आदी उपस्थित होते. सभेला संघाच्या सभासद असलेल्या दूध सोसायट्यांचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते. या वेळी सभासदांनी आपल्या दूधपुरवठा, दूध सोसायटीचे कामकाज, चुकारे वितरण व इतर बाबींच्या वेळेस येणाऱ्या अडचणी, समस्या याची माहिती दिली. त्याची माहिती संकलित करून तातडीने या समस्या सोडविल्या जाव्यात, अशा सूचना संचालकांनी दिल्या.

दूध संघाच्या लेखा परीक्षण अहवालाची माहिती देण्यात आली. तसेच दूध संघाचे केलेली कामे, प्रगती याचा अहवालही सभासदांना देण्यात आला.

खडसेंच्या आरोपावर उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दूध संघाचा तोटा अधिक आहे. दूध संघाचे कामकाज करण्यासंबंधी संचालक मंडळाला अपयश येत आहे, अशी टिका केली होती. त्यावर संचालक मंडळातील गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांनी उत्तर दिले. खडसेंच्या सत्ताकाळात दूध संघाचा तोटा अधिक होता, तो कमी केला आहे. खडसे यांनी दूध संघात येऊन माहिती घ्यावी, असे पाटील व महाजन म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com