Gadchiroli News : गेल्या अनेक महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. या हत्तींनी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान केले. आता तर त्यांनी थेट गडचिरोली शहरात एन्ट्री मारली आहे.
२५ मे रोजी मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास गडचिरोलीच्या अनेक मार्गावरून त्यांनी मुक्त संचार केला. दरम्यान वनविभागाला याची माहिती होताच त्यांनी या हत्तींचा मार्ग बदलला. या प्रकारामुळे आता गडचिरोलीत भीतीचे वातावरण पसरले आहे.
ओडिसा येथील जंगलातून रानटी हत्तींचा कळप साधारण वर्षभरापूर्वी गडचिरोलीत दाखल झाला. तेव्हापासून जिल्ह्यातील विविध भागात कुरापती करीत आहेत. या हत्तींनी शेतीपिकांचे, घरादारांचे मोठे नुकसान केले आहे.
आरमोरी येथील इंदिरा सहारे या महिलेला हत्तीने जखमी केल्याची घटना नुकतीच घडली होती. रानटी हत्तींचा हा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून ऐरणीवर आहे. गावागावांतील शेतकरी हा हत्तींमुळे धास्तावले आहेत. दरम्यान गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आपली दस्तक देणाऱ्या हत्तींनी आता थेट शहरात एन्ट्री मारली.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री दस्तुरखूद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. हत्तींच्या नुकसानीची ही गंभीर समस्या सोडविण्याची आम्ही अनेकदा मागणी केली. पाठपुरावा केला. पण याकडे सत्ताधारी दुर्लक्ष करीत आहेत. आता मुद्दा ऐरणीवर आला असून आतातरी याकडे मुख्यमंत्री फडणवीस लक्ष देतील का हा प्रश्न आहे.- महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी, गडचिरोली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.