Nashik News : ऐन पेरणीच्या दिवसात यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावलेली नव्हती. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर चालू आर्द्रा नक्षत्रात पाऊस सुरू झाला. सुरुवातीला निफाड, चांदवड, मालेगाव, देवळा, येवला या तालुक्यांमध्ये जोरदार सुरुवात झाली. मात्र काही ठराविक ठिकाणी हा पाऊस बरसला.
मात्र सोमवारनंतर (ता. २६) जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सूनचे आगमन झाले. त्यामुळे शेतकरी सुखावला. अनेक ठिकाणी पेरणी योग्य पाऊस पडला तर काही ठिकाणी अद्यापही पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
जिल्ह्यातील जूनचे सरासरी पर्जन्यमान १५७ मिलिमीटर आहे मात्र मंगळवारी (ता. २७) गेल्या २४ तासांत सकाळी ८ वाजेपर्यंत ४२.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात पावसाने सलग चार दिवस वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावून काहीसा दिलासा दिला.
नाशिक, दिंडोरी, निफाड, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, कळवण, सटाणा, सिन्नर, येवला, त्रंबकेश्वर, चांदवड, देवळा, सिन्नर, मालेगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. तर जिल्ह्यात अधूनमधून मध्यम ते हलक्या सरी सर्वदूर पडत आहेत.
जिल्ह्याच्या भात पट्ट्यातील सुरगाणा तालुक्यातील उंबरठाणा, मनखेड, बाऱ्हे, बोरगाव व सुरगाणा महसूल मंडळात पावसाने जोरदार हजेरी लावली. पेठ तालुक्यातही पावसाचा जोर दिसून आला. तर इगतपुरी तालुक्यातील धारगाव, वाडीवऱ्हे, इगतपुरी, घोटी महसूल मंडलात पावसाचा जोर होता. सटाणा, कळवण, दिंडोरी, मालेगाव, नांदगाव या भागात पावसाला सुरुवात झाली आहे.
उद्या जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र-मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यातील घाट विभागात आगामी जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
२८ व ३० जून, १ व २ जुलै रोजी मध्यम पावसाची तसेच गुरुवारी (ता. २९) जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.