Solapur Zilha Bank  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Zilha Bank : सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक का घेतली नाही? प्रतिज्ञापत्र सादर करा

Solapur Zilha Bank Election Update : कायद्यानुसार एखाद्या संस्थेवरील प्रशासकाचा कालावधी एक वर्षाचा असावा, असा नियम आहे.

Team Agrowon

Solapur News : कायद्यानुसार एखाद्या संस्थेवरील प्रशासकाचा कालावधी एक वर्षाचा असावा, असा नियम आहे. परंतु पाच वर्षे प्रशासक असूनही सोलापूर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक का घेतली गेली नाही, याबाबत राज्य सरकारने तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. २०) दिले आहेत.

न्यायमूर्ती धीरजसिंह ठाकूर आणि संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर या संदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली.

त्या वेळी हा आदेश झाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक घेण्यासंदर्भात कारंबा विकास सेवा सोसायटी, बाणेगाव विकास सेवा सोसायटी, मार्डी विकास सेवा सोसायटी आणि विकासरत्न दिलीप माने विकास सेवा सोसायटी नरोटेवाडी यांनी याचिका दाखल केल्या आहेत.

या याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. अभिजित कुलकर्णी यांनी बाजू मांडली. कायद्यानुसार प्रशासकाचा कालावधी एक वर्षापेक्षा अधिक ठेवता येत नाही, मे २०१८ मध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमण्यात आला.

पण नियमानुसार निवडणूक घेण्यात अधिकाऱ्यांना अपयश का आले, याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्‍नावर न्यायालयाने सरकारला येत्या ३ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. प्राधिकरणाच्या वतीने अॅड. दिलीप बनकर पाटील आणि बँकेच्या वतीने अॅड. भूषण वाळिंबे यांनी काम पाहिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT