Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : व्यापाऱ्यांवर कारवाई का नाही?

Onion Procurement : एप्रिल आणि मेपासून चाळीत साठविलेला कांदा खराब होत असल्याने शेतकऱ्यांना तो कांदा विक्री करण्यासाठी अडचण येत आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात १२ दिवसांपासून कांदा लिलाव बंद असून, लिलावात सहभागी न होणान्या व्यापाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न करीत अशा व्यापाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे गट) तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने घेतलेल्या निर्णयानुसार त्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घ्यावा अथवा लिलाव सुरू करण्यासाठी बाजार समित्यांना निर्देश द्यावेत, नवीन व्यापाऱ्यांना परवाने द्यावेत, यापैकी काहीही करा; पण निर्णय प्रलंबित ठेवू नका, अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे.

कांदा व धान्य लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसला आहे. बाजार समितीवर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागतो.

एप्रिल आणि मेपासून चाळीत साठविलेला कांदा खराब होत असल्याने शेतकऱ्यांना तो कांदा विक्री करण्यासाठी अडचण येत आहे. प्रत्येकवेळी वेगवेगळे प्रश्न निर्माण करणाऱ्या मुजोर व्यापाऱ्यांचा शासकीय यंत्रणेकडून शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. अशा व्यापाऱ्यांचे परवाने कायमचे रद्द करून त्यांना दिलेले प्लॉट, जागा, शेड व इतर सोयी-सुविधा काढून घ्याव्यात, अशी मागणी पाटील यांनी केली.

व्यापारी वर्ग नेहमी लिलाव बंद ठेवून कृत्रिम टंचाई निर्माण करीत लिलाव बंद कालावधीत आपल्याकडील कांदा इतर बाजारपेठांत पाठवून नफा कमावतात. काही व्यापारी रतलाम, मध्य प्रदेशातूनही कांदा खरेदी करतात.

फक्त आपल्या बाजार समितीला वेठीस धरत आहेत. अशा व्यापाऱ्यांची शासकीय यंत्रणेकडून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. व्यापारी संचालकांनी लिलाव बंदमध्ये सहभाग घेतला असल्यास अशा व्यापारी संचालकांचे पद रद्द करण्याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात यावेत.

- प्रकाश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख, निफाड

बाजार समितीने संबंधित व्यापारी वर्गास लिलाव कामकाजात सहभागी होण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत. त्या अनुषंगाने शासनस्तरावर लिलाव प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. तथापि, शेतकरी हितासाठी बाजार समितीने विंचूर व निफाड उपआवारात कांदा देणे सुरू केले आहे.

- नरेंद्र वाढवणे, सचिव-बाजार समिती, लासलगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT