Sugarcane  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farming : ऊस शेती करताना माती परीक्षण का असते महत्त्वाचे?

Sugarcane Crop : पश्चिम महाराष्ट्रात ऊस हे मुख्य पीक आहे. या पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. या पिकाचे उत्पादन वाढीसाठीही दिवसेंदिवस शेतकरी झटत आहेत.

Team Agrowon

मोहन मनोहर खोत

Sugarcane Update In Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात ऊस हे मुख्य पीक आहे. या पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. या पिकाचे उत्पादन वाढीसाठीही दिवसेंदिवस शेतकरी झटत आहेत. यामध्ये काही शेतकरी यशस्वीही होत आहेत.

एकीकडे एकरी २० टन ऊस उत्पादन घेणारा शेतकरी, तर दुसरीकडे एकरी १२० टनांपेक्षा जास्त उत्पादन घेणारे प्रयोगशील शेतकरी, असे दृश्य पाहायला मिळत आहे. असे असले तरी सरासरी एकरी ३८ ते ४० टनांपर्यंतच सर्व साधारण शेतकऱ्यांचे उत्पन्न असल्याचे साखर कारखान्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

तरीसुद्धा मूठभर शेतकरी एकरी १०० टनापेक्षा जास्त उसाचे उत्पादन घेत असल्याचे पाहून सर्वच शेतकऱ्यांनी एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पादन घ्यावे. यासाठी काही साखर कारखान्यांनी प्रयत्न चालू केले आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना उत्पादन वाढीचे शास्त्र सांगण्यासाठी शेतकरी परिसंवाद घडवण्यास सुरुवात केली आहे.

या परिसंवादात प्रामुख्याने माती परीक्षणाचा मुद्दा बाजूला पडत आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित १०० टनांचा खताचा डोस सांगून जादा खते टाकली की जास्त उत्पादन येते. हे बिंबवलं जातं आहे. साहजिकच शेतकरी सवयीने शिफारशीपेक्षा जास्त खते टाकत राहतो. शेतकरी फक्त खते जास्त टाकली की जास्त उत्पादन येते, अशा भ्रमात राहतो.

खताशिवाय उत्पादन वाढीसाठी जमिनीचा पोत, हवामान, मशागत, जमिनीचा ईसी, पीएच, सेंद्रिय कर्ब व जमिनीत अगोदर शिल्लक असलेल्या खताकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे १०० टनाऐवजी ५०-६० टनापर्यंतच उत्पन्न येते. साहजिकच शेतात टाकलेल्या अपेक्षित १०० टनाच्या खतातील ५०-६० टक्के मात्रा पिकाने उचललेली असते.

बाकीचे ४० टक्के खत जमिनीतच शिल्लक राहते. परत दुसऱ्या वर्षी शेतकरी अपेक्षित १०० टन खताचा डोस शेतात टाकतो. यावेळी ही अपेक्षित उत्पन्न येत नाही. जाद खत जमिनीत शिल्लक राहते.

अशाच प्रकारे माती परीक्षणाविना शेतकरी खतेदेत राहिला तर जमिनीतील शिल्लक खतांचा व वरून देत असलेल्या खतांचा मेळ न जमल्यामुळे जमिनीचा पोत दिवसेंदिवस खराब होत जाणार आहे. आणि मग रासायनिक खतांमुळे जमिनी खराब होत आहेत.

त्यामुळे सेंद्रिय शेतीला पर्याय नाही, अशी ओरड चालू होते. तेव्हा उत्पादन वाढीसाठी जादा खताची मात्रा आवश्‍यक आहे, पण जमिनीत शिल्लक खतेही पिकांना उपलब्ध व्हावीत. यासाठीही प्रयत्न व्हायला पाहिजेत. त्यासाठी उसाबरोबर कोणत्याही पिकाला खताची शिफारस करण्यापूर्वी जमिनीतील शिल्लक खत जाणून घेण्यासाठी माती परीक्षण महत्त्वाचे आहे.

जमिनीतील शिल्लक खते पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी जिवाणूचा वापर केल्यास उत्पादन तर वाढेलच त्याशिवाय उत्पादन खर्च कमी होऊन शेती सुपीक होण्यास मदत होईल. त्याकडेच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न काही वाढत नाही, पण उत्पादन खर्च मात्र निश्चित वाढतो. त्याशिवाय शेतीचा पोत खराब होतो. ते वेगळेच.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

Pandharpur Wari: पंढरपूरच्या वाटेवर संतांचे पालखी सोहळे

Maharashtra Transport Strike: मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला प्रतिसाद

Tur Dal Cess Scam: तूर सेस चोरीच्या दंडाचे २६ लाख न्यायालयात आगाऊ भरावेत

Global Onion Market: भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान, चीनच्या कांद्याला मागणी

SCROLL FOR NEXT