Integrated farming
Integrated farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Integrated farming : एकात्मिक शेती फायद्याची का आहे?

Team Agrowon

बदलत्या हवामानामुळे मागील काही वर्षापासून हंगाम खरीप (Kharif) असो किंवा रब्बी (Rabbi) नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा योग्य भाव न मिळाल्यामुळे  शेतकऱ्याला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं.

शेतीचं योग्य नियोजन केलं तरी वाढत्या नैसर्गिक आपत्तींनी उत्पादन हाती लागेल की नाही, याची शाश्वती नसते. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींनी हंगामी पिके नष्ट झाली की इतर उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने शेतकऱ्याचं नुकसान होतं.

त्यामुळे शेतीला पूरक व्यवसायांची जोड देणं आता गरजेचं झालं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती (Integrated farming) पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे. 

एकात्मिक शेती पद्धती म्हणजे काय?

हंगामी पिकांसोबतच फळे, भाजीपाल्याचे उत्पादन घेताना त्याला पशू-पक्षिपालन, मत्स्यपालन अशा पुरक व्यवसायाची जोड जेऊन केलेली शेती म्हणजेच एकात्मिक शेती पद्धती होय. 

एकात्मिक शेती पद्धतीवर संशोधन करणारे कृषी शास्त्रज्ञ डॉ. दयाशंकर श्रीवास्तव सांगतात की, वाढती लोकसंख्या आणि कमी होत चाललेली  नैसर्गीक संसाधने यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीकडे वळण्याची गरज आहे.

आपल्याकडे असलेल्या मर्यादित शेतजमिनीच्या प्रत्येक इंचाचा वापर करून आपण चांगला नफा मिळवू शकतो.

यासाठी आपल्या शेतजमिनीचा आभ्यास करुन  प्रथम एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल तयार करावे. 

आपल्या स्वतःच्या शेतीसाठी एकूण क्षेत्र आणि उपलब्ध संसाधने यांचा विचार करून योग्य असे मॉडेल तयार करावे. पीकनिहाय मॉडेल तयार करताना कुटुंबांची आहाराची गरज आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घ्यावी.

त्याच प्रमाणे जो कोणताही पूरक व्यवसाय करणार आहोत, त्यासाठीही नियोजन करावे. हे दोन्ही घटक एकमेकांना पूरक असावेत.

एका घटकाचे अवशेष किंवा उत्पादन हे दुसऱ्या घटकांसाठी निविष्ठा म्हणू वापरता आले पाहिजे. ही साखळी योग्य प्रकारे कार्यरत राहिल्यास खर्चात मोठी बचत होते. उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते.    

एकात्मिक शेती पध्दतीच्या मॉडेलचा प्रसार लहान व मध्यम शेतकऱ्यांपर्यंत झाला पाहिजे. कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकरी वर्गाचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी, त्याचबरोबर त्यांना शाश्वत उत्पन्न मिळून ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल फायदेशीर असल्याचे डॉ. दयाशंकर श्रीवास्तव सांगतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Green Hydrogen Project : हिमाचल प्रदेशच्या झाकरीत देशातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प

Sustainable food : कार्बन फूटप्रिंट की शाश्‍वत अन्न?

Mumbai APMC Scam : संजय पानसरे यांना न्यायालयीन कोठडी

Elephant Issue in Germany : हत्तींवरून दोन देशांमध्ये रणकंदन

SCROLL FOR NEXT